विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला अभिवादन मॅराथॉन रॅली

ओबीसी परिषदेच्या वतीने आयोजन

0

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ओबीसी परिषदेच्या वतीने अभिवादन मॅराथॉन रॅलीचे आयोजन शनिवारी सकाळी सहा वाजता करण्यात आले आहे.

शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरून या स्पर्धेला सुरवात होणार आहे. खाती चौक, गांधी चौक, टागोर चौक, गणेशपूर, चिखलगाव, टिळक चौक या मार्गाने दौड करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर या रॅलीचा समारोप होईल.

या मॅराथॉन रॅलीत शहरातील अनेक धावपटंसह अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, ठाणेदार बाळासाहेब खाडे व प्रा. दिलीप मालेकर उपस्थित राहणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक प्रदान करण्यात येणार असून जास्तीत जास्त खेळाडूंनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन ओबीसी परिषदेचे प्रवीण खांनझोडे, अखिल सातोकर, सिद्दिकी रंगरेंज यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.