तेंदुपत्ता संकलन चालकांवर वनकायद्यांतर्गत कारवाई

अनधिकृत तेंदुपत्ता संकलन केंद्रामुळे मजुरांचे नुकसान

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भीमनाळा महसुली गावांतर्गत येणाऱ्या शिरटोकी पोड येथे अनधिकृत वनहक्क समितीचे संकलन केंद्र सुरू आहे. तेंदुपत्ता संकलन केंद्र त्वरित बंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी उपवनसंरक्षक पांढरकवडा यांच्याकडे केली होती. गावकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत वनविभागाच्या पथकाने अनधिकृत संकलन केंद्रावर धाड टाकून चालकावर वन कायद्यांतर्गत कारवाई केली.

भीमनाळा ग्रामसभेने पर्याय क्र १ ची निवड करून तेंदुपत्ता संकलन विक्री व व्यवस्थापन वनविभागामार्फत ई-निविदा होऊन अधिकृत परवानाधारक शिरातल ट्रेंडिग कंपनी असून यांना तेंदूपत्ता देण्यास गावकरी तयार आहे. शिराटोकी पोड येथे काही अनधिकृत स्वयंघोषित व वनहक्क समिती व बाहेरील अशासकीय संस्थांनी गावातील अशिक्षित कोलाम लोकांना चुकीची माहिती देऊन दुसरे अनधिकृत तेंदुपत्ता संकलन केंद्र सुरू केले. यामुळे गावातील मजुरांचे व ग्रामसभेचे मोठे नुकसान होत आहे.

तेंदुपत्ता संकलनामुळे मजुरांना मिळणार बोनस ( रॉयल्टी) खाजगी व्यक्तीमार्फत देऊन अपहार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भीमनाळा गावांतर्गत येणाऱ्या शिराटोकी येथील अनधिकृत तेंदुपत्ता संकलन केंद्र त्वरित बंद करा, अशा आशयाची मागणी वजा तक्रार तुकाराम दडांजे,ओम लेतू ढोबरे,प्रकाश मारोती जुनमरे, वैद आत्राम, दादाराव दडांजे ,भीमराव कुमरे, श्यामराव आत्राम, पोतू टेकाम,गणपत रायपुरे, चंदू आत्राम, रामा आत्राम, विलास मडावी, संदीप आत्राम, गजानन टेकम, भीमा आत्राम, रामदास शेडमाके, राकेश आत्राम, महादेव आत्राम यांनी पांढरकवडा उपवनसंरक्षकांकडे दिली होती. त्या अनुषंगाने वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी पोलीस ताफा घेऊन सदर अनधिकृत तेंदूपत्ता संकलन केंद्रवर धाड टाकली.

वनविभागाच्या पथकाने पुडके जप्त करून कारवाई करीत असताना संकलन केंद्र चालक व गावातील काही लोकांनी मज्जाव केला. सायंकाळ झाल्याने वनविभाग व पोलीस विभागांना परत गेले. परंतु अनधिकृत तेंदुपत्ता संकलन केंद्र चालक वसंत फुलू कुमरे यांच्यावर वनकायदा अंतर्गत कारवाई केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मेहेरे यांनी दिली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.