पुरुषोत्तम नवघरे, वणी: रक्तपेशी ह्या आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहेत. त्या अहोरात्र नष्ट होत असतात. त्याच बरोबर नव्याने तयारही होत असतात. मात्र त्या बंद झाल्यात तर आरोग्य धोक्यात येतं. थालेसेमिया हा आजार सिकलसेल श्रेणीतला असल्याने तो आनुवंशिक आहे. तो पालकांकडून पाल्यामध्ये प्रसारित होतो. त्यामुळे या आजाराची काळजी घेणे गरजेचं आहे. असं प्रतिपादन शासकीय ग्रामीण रुग्णालय वणीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती काकडे यांनी केलं. शासकीय ग्रामीण रुग्णालय वणीच्या ट्रॉमा केअर हॉलमध्ये ८ मे जागतिक थालेसेमिया दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र सुलभेवार होते. ग्रामीण रुग्णालय वणीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती काकडे ह्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. प्रमुख पाहुणे म्हणून परिसेविका अरुणा गुरनुले व गीत घोष होते.
डॉ. काकडे पुढे बोलताना म्हणाल्यात, की थालेसेमिया हा आजार रक्तपेशी तयार न होणं किंवा कमी तयार होणं ह्यामुळं होत असतो. या थालेसेमिया आजाराचे मेजर आणि मायनर असे दोन प्रकार असतात. मायनर प्रकारात औषधी घेऊन लक्षणे कमी करता येतात. मात्र मेजर थालेसेमिया मध्ये बोन मॉरो ट्रान्सप्लांट करावा लागतो. त्यामुळे ह्याची काळजी घेणे अती आवश्यक असते. म्हणून लग्नापूर्वी आपण सर्वांनी ब्लड टेस्टिंग करूनच विवाह संबंध केले पाहिजे. असंही डॉ. काकडे यांनी आवर्जून सांगितलं. हा कार्यक्रम हिंद लॅब्स डाइग्नोस्टिक सेंटरनं घेतला. कार्यक्रमाचं संचालन शीतल राजगडकर यांनी केलं. आभार धनश्री सूर्यवंशी ह्यांनी मानलेत. हा दिवस लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी, माहिती देण्यासाठी साजरा केला जातो. या कार्यक्रमास शासकीय ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका, कर्मचारी व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.