अन् शाहरुख ठरला ‘डुप्लिकेट’…

तीन वेळा क्वारंटाईन झालेल्या शाहरूखची अखेर वणीत वापसी....

0

जब्बार चीनी, वणी: शाहरुख खानचा डुप्लिकेट हा सिनेमा तुम्हाला माहिती असेलच. यात एक शाहरुख काहीतरी करतो आणि त्याचे परिणाम दुस-या शाहरुखला भोगावे लागतात. असाच काहीसा प्रकार वणीतील यवतमाळ येथे आयसोलेशनमध्ये भरती झालेल्या ‘शाहरुख’ सोबत घडला. तो निजामुद्दीनला गेलाच नव्हता. मात्र तो ‘डुप्लिकेट’ ठरला व त्याच्यावर आयसोलेशनमध्ये जाण्याची वेळी आली. यवतमाळला गेल्यावरही तो पुन्हा दुस-यांना डुप्लिकेट ठरला व त्याच्यावर तब्बल महिन्याभर यवतमाळला थांबण्याची वेळ आली. विशेष म्हणजे त्याच्यासोबत वणीतील भरती झालेले एक आठवड्याआधीच परत आले होते. ही कहाणी आहे एक, दोन नाहीतर तीन वेळा क्वारंटाईनचा अनुभव घेतलेल्या शाहरूखची (बदललेले नाव)…

सविस्तर घटना अशी की निजामुद्दीन परिसरात फिरत असलेल्या वणीतील चौघांना (3+1) मोबाईल लोकेशन ट्रेस करून 1 एप्रील रोजी यवतमाळ येथे आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले होते. केवळ दोन दिवसांचे काम आहे इतक्या माहितीवर गेलेल्या त्या तिघांना काही कारणास्तव तब्बल 24 दिवसानंतर सर्व रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र त्याच्या सोबत असलेली चौथी व्यक्ती मात्र घरी परतायला तब्बल एक महिन्याचा वेळ लागला. केवळ स्वःताच्या थोड्याशा चुकीमुळे या व्यक्तीला एक महिन्याचा ‘आयसोलेशन’ भोगावा लागला. ही कहाणी आहे शाहरुखची.

प्रातिनिधिक फोटो

खाया पिया कुछ नही गिलास तोडा बाराना…
शाहरुख (बदललेले नाव वय – 21) हा इस्लामपु-यातील रहिवाशी आहे. तो  एका दुकानात काम करतो. शाहरुखने त्याच्या नावावर असलेले सिमकार्ज त्याच्या नातेवाईकाला दिले होते. ज्या व्यक्तीला सिमकार्ड दिले ती व्यक्ती निजामुद्दीन दर्गाहमध्ये गेली होती. मरकज प्रकरण समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून निजामुद्दीन परिसरातून परराज्यात गेलेल्या लोकांची लिस्ट तयार केली. त्यात वणीतील तीन लोकांचा समावेश होता. तर शाहरुखने या तीन व्यक्तीपैकी एका व्यक्तीला सिम कार्ड दिल्याने त्याचे लोकेशनही निजामुद्दीन येथे दाखवण्यात आले. परिणामी त्या तीन व्यक्तींसोबत शाहरुखवरही आयसोलेशन वार्डात जाण्याची वेळ आली. मुळात शाहरुख हा एक ते दीड वर्षापासून वणीबाहेर गेलेला नव्हता.

काही संबंध नसताना एकदा शाहरुख या प्रकरणात अडकला. त्याच्यावर यवतमाळला आयसोलेशन वार्डात दाखल होण्याची वेळ आली. मात्र यवतमाळला पुन्हा दुस-यांदा शाहरुख विनाकारण अडकला. वणीतील चारही व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. मात्र त्यांच्या वार्डातील एक व्यक्ती पॉजिटिव्ह आल्याने खबरदारी म्हणून त्या वार्डातील सर्व लोकांची पुन्हा चाचणी घेण्यात आली. दुस-यांदाही वणीतील सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे हे तिघे परत आले तर शाहरुख मात्र पुन्हा डुप्लिकेट ठरला व त्याच्यावर तिथेच थांबण्याची वेळ आली.

अन् शाहरुख पुन्हा ठरला ‘डुप्लिकेट’

डॉक्टरांना दुस-या गावातील एका शाहरुखची चाचणी घ्यायची होती. मात्र नावाच्या साधर्म्यामुळे त्यांनी वणीतील शाहरुखची चाचणी घेतली. शाहरुखने आधीच चाचणी झाल्याचे सांगितले होते. मात्र वरून ऑर्डर आल्याने त्यांना शाहरुखची चाचणी घ्यावी लागली. नंतर कळले की त्यांनी दुस-या गावातील शाहरुख ऐवजी वणीच्या शाहरुखची चाचणी घेतली. त्यामुळे त्या चाचणीचा रिपोर्ट येत पर्यंत शाहरुखला पुन्हा एकदा आयसोलेशन वार्डात थांबण्याची नामुश्की आली. अखेर तिसरा रिपोर्टही निगेटिव्ह आला व महिन्याभरानंतर शाहरुखची वणीत वापसी झाली.

(सिनेमा – डुप्लिकेट)

1 महिना थांबून कंटाळा आला होता – शाहरुख
इतर सर्व साथी घरी गेले होते. त्यामुळे शेवटी वणीतील मी एकटाच उरलो होतो. त्यामुळे तिथे राहताना बेचैनी वाढली होती. करमत नव्हते. त्यात रमजान महिना सुरू झाल्याने घरी लवकरात लवकर जाण्याची ओढ लागली होती. पण नामामुळे झालेल्या गोंधळामुळे थांबण्याची वेळ आली. एक महिना थांबून कंटाळा आला होता. घरच्यांची, वणीची आठवण सारखी येत होती. त्यातच मी विनाकारण अडकल्याने आणखी वाईट वाटत होते. अखेर घरी परत आल्याने आनंद होत आहे. – शाहरुख

हे पण वाचा: भाग 1 – केवळ दोन दिवसांसाठी गेले आणि 24 दिवस थांबले

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.