ब्रेकिंग : वणी परिसरात दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद

जितेंद्र कोठारी, वणी : मागील काही दिवसांपासून वणी परिसरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. घराच्या कंपाऊंड मधील ते शेत शिवारात उभी असलेल्या दुचाकी चोरट्यांच्या निशाण्यावर होती. दुचाकी चोरीच्या वाढत्या तक्रारीमुळे पोलिसांचीही डोकेदुखी वाढली होती. अखेर दुचाकी चोरट्यांना पकडण्यासाठी मुकुटबन व वणी पोलिसांनी संयुक्त व्ह्युरचना आखून 7 दुचाकी चोरट्यांना अटक केली. चोरट्यांकडून चोरीची 2 मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. अटकेतील चोरट्यांना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्यात आले असून आणखी काही गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता आहे. 

आरोपी आकाश विजय धवने (23), रा. वनोजा (देवी) व आकाश विजय अक्कलवार (24) रा. राळेगाव यांना तैलीफेल वणी येथून चोरलेली बजाज डिस्कवर मो. सा. क्र. MH 29 AS 8292 घेऊन जात असताना वणी पोलिसांनी 10 जुलै रोजी अटक केली. तर दुसऱ्या घटनेत मुकुटबन पोलिसांच्या ताब्यातील आरोपी राहुल मारोती दुर्गे (27), राजेश संतोष चिंतावार (21), अक्षय अशोक चेलपेलवार (20) तिन्ही रा. मुकुटबन, रा. झरीजामणी, रितिक किशोर किनाके (23), रा. पांढरकवडा व शुभम विठ्ठल राऊत (23), रा. कोसारा, ता. झरीजामणी ह.मु. आखाडा वार्ड पांढरकवडा या 5 आरोपींना वणी पोलीस स्टेशन हद्दीत उमरी शेत शिवारातून 2 जुलै रोजी स्पलेंडर मो.सा. नंबर MH 29 Q 5042 चोरी गेल्या प्रकरणात वणी पोलिसांनी अटक केली. 

अटकेतील सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता 12 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडून दुचाकी चोरीचे आणखी काही गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजित जाधव, स. फौ. सुदर्शन वानोळे, दिगंबर किनाके, सुहास मंदावार, हरिंद्र भारती, विशाल गेडाम, पुरुषोत्तम दडमल यांनी केली.

Comments are closed.