जितेंद्र कोठारी, वणी: भारतीय हिंदू परंपरेच्या जुन्या रीतीरिवाजाप्रमाणे आई वडिलांच्या पार्थिव शरीरावर अंत्यसंस्कार सोपस्कार फक्त मुलगा करू शकतो. मात्र बदलत्या युगात आता सामाजिक रूढी आणि परंपरेला फाटा देत मुलीसुद्दा आई वडिलांचे आपल्यावर ऋण फेडण्यात पुढे आल्यात. यावेळी मुकुटबन वासियांचे डोळे पाणावले.
मुकूटबन येथील जि.प. शाळेतील शिक्षिका वैशाली दशरथ विधाते (40) हिने पोटाच्या आजाराने त्रस्त होऊन बुधवार 3 मार्च रोजी घरातील पाण्याच्या टाकीत उडी मारून आत्महत्या केली होती. वैशालीला दोन मुली आहेत. घटनेच्यावेळी वैशालीची मोठी मुलगी कु. स्नेहल ही नीट परीक्षेच्या कोचिंगसाठी कोटा (राजस्थान) येथे होती. तर लहान मुलगी कु. सृष्टी ही ट्युशन क्लासेजला गेली होती.
वैशालीची मोठी मुलगी कोटा येथून पोहचल्यानंतर शुक्रवारी मुकूटबन येथील मोक्षधाममध्ये तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्यसंस्कार प्रसंगी सर्व विधी पार पाडत मृतक वैशालीची मोठी मुलगी स्नेहल हिने आईच्या चितेला मुखाग्नी दिली.
हे देखील वाचा: