जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना महामारीच्या अनुषंगात लॉकडाउनमुले मागील अडीच महिन्यापासून सलून व्यावसायिकांची दुकाने बंद असून नाभिक समाज बांधव व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे शासनाने सलून व्यावसायिकांच्या समस्येकडे लक्ष देऊन आर्थिक मदत करावी व केश कतर्नालय सुरू करण्याची परवानगी द्यावी अशा आशयाचे निवेदन आज महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा यवतमाळच्या वतीने चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रचे खासदार बाळू धानोरकर यांच्या मार्फत उपविभागीय अधिकारी वणी यांना देण्यात आले. यावेळी आ. प्रतिभा धानोरकर व विश्वास नांदेकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
कोरोना महामारीच्या अनुषंगात लॉकडाउनमुळे गेल्या अडीच महिन्यापासून सलून व्यावसायिकांची दुकाने बंद असून सलूनचालक व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. हेअर कटिंग, सलून, ब्युटीपार्लर व्यावसायिकांची बहुतांश दुकाने भाडेतत्वावर आहे. सलूनच्या माध्यमातून कोरोना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे शासनाने सलून दुकाने उघडण्यास किंवा व्यवसाय करण्यास सक्त मनाही केलेली आहे. व्यवसाय ठप्प असल्याने उपासमारीची वेळ आली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी खासदार बाळूभाउ धानोरकर सह वरोरा भद्रावती विधानसभाची आमदार प्रतिभा धानोरकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व माजी आमदार विश्वास नांदेकर व नाभिक समाज महामंडळ यवतमाळ जिल्हाध्यक्ष शशिकांत नक्षिणे उपस्थित होते.