‘दादां’च्या पार्टीने केला वांदा, वाढवले अनेकांचे टेन्शन

पार्टीत सहभागी झाला होता कोरोनाबाधित...

0

जब्बार चीनी, वणी: आठवड्याभरापूर्वी एका पार्टीसाठी वणीतील प्रतिष्ठीत लोक एकत्र आले. पार्टीत सर्वांनी एकच धमाल केली. पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. घरी गेले. मात्र पार्टीत सहभागी होणा-या लोकांना याची पुसटशीही कल्पना नव्हती की ती पार्टी पुढे जाऊन त्यांच्या टेन्शनचे कारण बनू शकेल. त्या पार्टीत एक कोरोनाबाधित सहभागी झाल्याचे समोर येताच या पार्टीने सर्वांचाच ‘मजा किरकिरा’ केला असून ही पार्टी आता वादात सापडली आहे. या पार्टीबाबत वणीत एकच चर्चा रंगत आहे.

नागपूरच्या एका सुप्रसिद्ध बिल्डरचा वणीत एक महात्वाकांक्षी प्रोजेक्ट सुरू आहे. त्यानिमित्त ते वणीत आले होते. त्यांच्या कंपनीच्या वर्षपूर्तीनिमित्त 13 जूनला त्यांच्याद्वारा एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्या पार्टीत कंपनीच्या लोकांसह संबंधीत, नातेवाईक व मित्रपरिवारालाही आमंत्रित करण्यात आले. पार्टीसाठी छान ‘आस्वाद’ असलेल्या जेवणासाठी प्रसिद्ध असलेल्या एका रेस्टॉरन्टमधून जेवण मागवले गेले. आनंदाच्या क्षणी ‘स्नेह’ वाढवणा-या एका मिठाईच्या दुकानातून मिठाई मागवण्यात आली. कंपनीच्या पुढील कार्याला ‘आशिष’ देण्यासाठी वणीतील प्रतिष्ठीत लोकांनी हजेरी लावली. केक कापून जल्लोष साजरा करण्यात आला.

अन् सर्वांच्या तोंडाचे पाणी पळाले….
या पार्टीत कोरोनाबाधित सहभागी असल्याची माहिती समोर येत असल्याने पार्टीत सहभागी झालेल्या सर्वांच्याच तोंडाचे पाणी पळाले आहे. वणीतील सुमारे 50 प्रतिष्ठीत लोक या पार्टीत सहभागी झाल्याची माहिती आहे.

प्रातिनिधिक फोटो

ऐसा कैसे चलेगा ‘दादा’
पार्टी आयोजित करणा-या व्यक्तीची विदर्भातील एक सुप्रसिद्ध व्यावसायिक म्हणून तर ओळख आहेच. याशिवाय एक रसिक, कलाप्रेमी, साहित्यप्रेमी व एक कॉलमिस्ट म्हणूनही विदर्भच नव्हे तर महाराष्ट्राला ओळख आहे. लॉकडाऊऩच्या काळात कोरोनाविषयक त्यांचे ‘विचारी’ लेख अनेक प्रतिष्ठीत पेपरमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यात त्यांनी कोरोनाविषयी विचारी माणसासारख्या नोंदी मांडल्या आहेत. मात्र कोरोनाच्या काळातच त्यांनी पार्टीचे आयोजन केल्याने शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यानच्या काळात एक वाढदिवसाची आणि एक मॅरेज ऍनिवर्सरी पार्टीही चांगलीच चर्चेत आली आहे. या पार्टीतही अनेक लोक सहभागी झाले होते. या दोनतीन्ही पार्टीबाबत वणीत एकच चर्चा रंगत असून या पार्टीत सहभागी झालेले चांगलेच टेन्शनमध्ये आले आहेत. या संपूर्ण घडामोडीत सुशिक्षित, जबाबदार लोकांकडूनच बेजबाबदारी दिसून आल्याने सर्वसामान्य लोकांनी काय करावे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.