पॉजिटिव्ह व्यक्ती गेली अंत्यसंस्काराला… सर्व लोक कॉरन्टाईन

वणीमध्ये एकच खळबळ, ग्रामीण भागातील लोक कॉरन्टाईन....

0

सुनिल पाटील, वणी: तेली फैलात एक महिला पॉजिटिव्ह निघाल्याने त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कॉरन्टाईन करण्यात आले. त्यानंतर त्या सर्वांचे स्वॅब घेण्यात आले. मात्र कॉरन्टाईन असलेली एक महिला लपून छपून एका कार्यक्रमासाठी बाहेर येते आणि कार्यक्रमाला जाते त्यानंतर त्या महिलेचा रिपोर्ट पॉजिटिव्ह येतो. आणि सुरू होते प्रशासनाची धावपळ. ही धक्कादायक घटना आहे वणीतील. सध्या त्या महिलेच्या एका चुकीमुळे व प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ती ज्या कार्यक्रमात गेली होती त्या कार्यक्रमातील सहभागी सर्व व्यक्तींना कॉरन्टाईन कऱण्यात आले आहे.

तेलीफैल परिसरातील एका 65 वर्षिय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे सेवाग्राम येथील रुग्णांलयात निष्पन्न झाले होते. ती शहरातील दुसऱ्या साखळीतील (पेट्रोल पम्प) सदस्य आहे. यामुळे प्रशासनाने त्या परिसराला सील केले होते. तर जवळच्या संपर्कातील व्यक्तींना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले. तेव्हा पासून कोरोना संसर्गाची वाढ सातत्याने होताना दिसत असून साध्यस्थीतीत त्या परिसरात 9 बाधित रुग्ण आहेत.

शहरातील तेलीफैल हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. या परिसरात कोरोना बाधितांची सर्वाधिक नोंद झाली असून एका महिलेचा मृत्यू सुध्दा झाला आहे. याच प्रतिबंधित परिसरातील एक महिला दि. 22 जुलैला लगतच असलेल्या चिखलगाव येथे नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला गेली होती. त्यानंतर तीन दिवसांनी ती पॉजिटिव्ह असल्याचे आढळून आली.

प्रशासनाने जवळच्या संपर्कातील व्यक्तींना विलगिकरण कक्षात दाखल केले. परंतु नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारविधीला गेल्याचे तिने पॉजिटिव्ह निघाल्याच्या चार दिवसानंतर सांगितल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. संपर्कातील व्यक्तींना ट्रेस करताना नाकीनऊ आले. अखेर अंत्यसंस्कारविधीला सहभागी झालेल्या व बधितांच्या संपर्कातील 31 व्यक्तीना विलगिकरण कक्षात दाखल कऱण्यात आले आहे. यातील बहुतांश व्यक्ती कायर गावातील असल्याने आता ग्रामीण परिसर सुद्धा कोरोना विषाणूजन्य आजाराच्या विळख्यात सापडणार का? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.

प्रशासनाच्या ढिम्म कारभाराचा फटका वणीकर नागरिकांना सोसावा लागेल असे सद्यस्थीतीत दिसत आहे. चक्क प्रतिबंधित क्षेत्रातील महिला लगतच्या चिखलगावात अंत्यसंस्काराला हजेरी लावते आणि अंत्यसंस्कारात सहभागी असलेल्या सर्वच्या सर्व व्यक्तींना कॉरन्टाईन करण्याची वेळ आली आहे. या प्रकरणात प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे प्रतिबंधित क्षेत्रातील महिलेचा बेजबाबदारपणा उजागर होत आहे.

शहरातील तेलीफैल एक दिवस कोरोनाचा हॉटस्पॉट होईल असे भाकीत वणीकर नागरिक करीत होते. त्याची प्रचिती आता येताना दिसत आहे. स्लम एरिया असल्यामुळे लोकवस्ती दाटीवाटीची आहे. अशा परिसरात कोरोनाचा शिरकाव होऊ नये याची खबरदारी प्रशासनाने घेणे गरजेचे होते. आणि झालीच तर काटेकोर अंमलबजावणी करणे अभिप्रेत असताना प्रतिबंधित क्षेत्रातील महिला बाहेर पडलीच कशी हा संशोधनाचा विषय झाला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.