मुकुटबनमध्ये जनता कर्फ्यू 100 टक्के यशस्वी

वणीच्या कोरोनाची घेतली मुकुटबनवासीयांनी धास्ती

0 1,358

सुशील ओझा, झरी: आज मुकुटबन येथे स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यात आला. हा जनता कर्फ्यून 100 टक्के यशस्वी झाला. लोकांनी घराबाहेर न पडून हा बंद यशस्वी केला. वणी येथे कोरोनाचे 7 कोरोनाचे रुग्ण मिळाल्याने वणीसह झरी तालुकासुद्धा दहशतीत आला आहे. आजचा दिवस बाजारपेठेचा असते. बाजाराला मोठ्या संख्येने वणीहून व्यापारी येतात. त्यामुळे ग्रामपंचायत व व्यापारी असोसिएशनने जनता कर्फ्यू बाबत पुढाकार घेतला होता. पुढच्या सोमवारीही जनता कर्फ्यू राहणार आहे.

मुकूटबन सह परिसरातील अनेक गावातील मुख्य बाजारपेठ वणी असल्याने गावकरी तसेच दुकानदार तिथूनच आपले किराणा समान व इतर वस्तू खरेदी करतात. रोज शेकडो लोक खरेदीसाठी वणीमध्ये जातात हजारो लोक सुद्धा खरेदी करिता वणीलाच जाऊन खरेदी करीत असल्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. वणी ते मुकूटबन ३२ किमी अंतर असून कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन मुकूटबन ग्रामपंचायत सरपंच शंकर लाकडे उपसरपंच अरुण आगुलवार सचिव कैलास जाधव ग्रामपंचायत सदस्य  व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विजय कोठारी मंगेश गादेवार प्रदीप मासिरकर यांनी पुढाकार घेऊन गावातील प्रतिष्टीत सामाजिक कार्यकर्ते व गावातील लोकांचा विचार व सोबत घेऊन सोमवारचा आठवडी बाजार भरू न देण्याचा व एक दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर केला होता.

तसेच ६ जुलैला पुढील सोमवारलाही जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच अनुषंगाने २९ तारखेचा जनता करर्फ्यु ला दुकांदारासह गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावातील मुख्य मार्ग व गावातील अंतर्गत रस्ते सुनसान झाले होते. या जनता करफ्यु मुळे नक्किच कोरोना ला दूर ठेवण्याचे कार्य केल्याने समाधान व्यक्त होत आहे. जनता कर्फ्यु करिता ठाणेदार धर्मा सोनुने यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान वणी पाटण व इतर ठिकाणावरून येणाऱ्यांना मुकुटबन येथे प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती.

Comments
Loading...