मुकुटबन ते बोरी राज्यमार्ग एका महिन्यातच उखडला

ठिकठिकाणी खड्यांचे साम्राज्य, स्थानिक नेत्यांची चौकशीची मागणी

0

सुशील ओझा, झरी: मुकुटबन ते पाटण बोरी राज्य मार्गचे 28 किमी अंतराच्या रोड दुरुस्तीचे सध्या काम सुरू आहे. पाटण ते बोरी 16 किमी अंतराच्या रस्त्यावर 2 ते 3 फुटाचे खड्डे पडले असून त्यात पाणी साचले आहे. तर मुकुटबन ते पाटण दरम्यान नवीन रस्ता डांबरीकरण केलेला आहे परंतु एका महिन्यातच या रस्त्यावर शेकडो खड्डे पडून रोड उखडायला सुरवात झाली आहे. ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे शासनाला चुना लागत आहे. मुकुटबन ते बोरी 84 कोटींचे काम असून रोड उखडत आहे.

पाटण ते बोरी पर्यंत होणाऱ्या कामात मोठा अपहार होत असून साईड पट्टीचे खोदकाम कमी असून मुरूम सुद्धा अल्प प्रमाणात टाकण्यात आले. डांबरीकरण व रुंदीकरण कामात गैरप्रकार होत आहे. अनेक ठिकाणावरील पुलाजवळ मुरूम न टाकल्यामुळे चिखलाचे साम्राज्य झाले आहे तर अपघातात प्रचंड वाढ झाली आहे.

याबाबत सरपंच निलेश येल्टीवार, संदीप बुरेवार, छोटू राऊत, युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल दांडेकर व हरिदास गुर्जलवार यांनी बांधकाम विभाग पांढरकवडा येथे तक्रार देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. तर मुकुटबन ते पाटण रस्ता नवीन काम करण्यात आले आहे . ह्या राज्यमार्गावर एक महिन्यातच शेकडो खड्डे पडल्याने संताप व्यक्त होत आहे.

सदर कामाकडे संबंधीत अभियंता यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्यामुळे निकृष्ट डांबरीकरण व रुंदीकरण चे काम सुरू आहे. 84 कोटीच्या रस्त्याच्या कामात शेकडो खड्डे पडले असून खड्डे बारीक गिट्टी व डांबर टाकून बुझविल्या जात आहे. एका महिन्यात नवीन रोडची अवस्था अशी असल्यास भविष्यात हा रोड टिकेल का ? असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रोडची चौकशी करावी तसेच कोणतेही अपघात झाल्यास याला जवाबदार बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी, अभियंता व संबंधीत ठेकेदार राहणार अशी तक्रार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप बुरेवार व युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल दांडेकर यांनी शासकीय बांधकाम विभाग याना दिली व मुकुटबन ते पाटण पर्यंतचा रोड खोदून नव्याने तयार करण्यात यावा अन्यथा बांधकाम विभाग कार्यासमोर उपोषणास बसू किंवा तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला.

हे देखील वाचा:

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

महागाई विरोधात युवक काँग्रेसचे स्वाक्षरी अभियान

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.