मे महिना मारेगाव तालुक्यासाठी ठरला आत्महत्येचा

महिनाभरात झालेल्या 8 आत्महत्येने तालुका हादरला

0

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान मे महिना हा तालुक्यासाठी आत्महत्येचा ठरला. यात एका अल्पवयीन युवती व कॉरेटाईन असलेल्या युवकासह शेतकरी व शेतकरी पुत्राचा सहभाग असून यासह महिन्याभरात एकूण आठ आत्महत्या झाल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आत्महत्येमुळे तालुकावासी हादरले आहे. मारेगाव तालुक्याच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच शासनदरबारी एवढ्या आत्महत्येची नोंद झाली असावी.

गौराळा येथील एका अल्पवयीन मुलीने दिनांक 5 में रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, विजय प्रभाकर भोयर वय 27 रा. पांढरकवडा यांनी गळफास घेऊन 8 मे रोजी, तसेच रोहित लाला दूधकोहळे वय 22 रा. पिसगाव यानें 12 मेला गळफास घेऊन, गणेश आत्माराम रोगे वय 35 रा.देवाळा यांनी 12 मे लाच विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

रामा विठ्ठल आत्राम वय 25 रा. गोंडबुरांडा यानें 16 मे ला गळफास घेऊन, तर हनुमंत रामराव आत्राम वय 60 रा.सुर्ला यांनी 20 मेला गळफास घेऊन तसेच निळकंठ चिमणा भडके वय 65 रा.धामणी यांनी तलावात उडी घेऊन तर महिण्याअखेर 31 में रोजी नरसाळा येथे सुनील गोविंदा टेकाम वय 32 या युवकाने सुद्धा गळफास घेऊन अशा एकून 8 जणांनी आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली.

कॉरेन्टाईऩ असताना आत्महत्या, देशातील पहिलीच घटना
गोंडबुरांडा येथील रामा विठ्ठल आत्राम या तरुणाने गावातीलच जिल्हा परिषद शाळेत कोरोन्टाईन असताना गावालगत असलेल्या तलाव परिसरात पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. लॉकडाऊऩच्या काळात कॉरोन्टाईन असताना आत्महत्या केल्याची ही देशातील पहिलीच घटना होती.

आत्महत्येत शेतकरी पिता-पुत्राचा सहभाग
सततची नापिकी व कर्ज बाजारीपणा मुळे हताश होऊन सुर्ला येथील हनुमंत रामराव आत्राम यांनी गळफास घेऊन तसेच धामणी येथील निळकंठ चिमणा भडके या शेतकऱ्यांनी तलावात उडी घेऊन तसेच पांढरकवडा येथील विजय प्रभाकर भोयर यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याचे उघडकीस आले, तसेच देवाळा येथील गणेश आत्माराम रोगे याने विहिरीत उडी घेऊन व रोहित लाला दुधकोहळे या शेतकरी पुत्रांनी सुध्दा नैराश्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.