गुरुकुल कॉन्व्हेंटची 100 टक्के निकालाची परंपरा कायम
चांदणी खरवडे 94.80 % गुण घेऊन तालुक्यातुन प्रथम
सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षेचा म्हणजेच 10 वीचा निकाल जाहीर झाला आहे. यात मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंट ची कु. चांदणी खरवडे हिने ९४.८० टक्के गुण घेऊन प्रथम कमांक प्राप्त केला तर साक्षी मुसळे आणि खुशी मेश्राम या विद्यार्थिनीं अनुक्रमे ९४.६० टक्के गुण मिळवुन द्वितीय कमांक प्राप्त केला तसेच खुशी येमुलवार हीने ९४. ४० टक्के गुण मिळवून तृतीय कमांक पटकाविला आहे.
कुमकुम मत्ते हिने ९३.८० टक्के गुण मिळवून चतुर्थ क्रमांक मिळविला आहे तसेच आकांशा टोंगे हिने ९३.६०% गुण प्राप्त करून पाचवा क्रमांक पटकावला. विशाल तुडमवार, केतन वडके यांनी अनुक्रमे ९३.२०% मिळवून सहावा क्रमांक मिळविला आहे. समीर गावंडे याने ९२.००% दीक्षा पारखी ९१.४०% साहिल दुरुतकर ९०.२०% सत्कार चिंतावर व अक्षय बादलवार यानी ८९.८०% गुण मिळवले.
विशेष बाब अशी की या शाळेचे ११ विद्यार्थ्यी विशेष गुणवत्ता श्रेणीत पास झाले तर ७ विदयार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत पास झाले. इतर विदयार्थ्यांनी सुध्दा गुणवत्ता यादीत आपले स्थान प्राप्त केले. शाळेचा एकूण निकाल १०० टक्के लागलेला आहे. विदयार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबदद्ल शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा, संचालक मंडळ, मुख्याध्यापक सुभाष गजभिये व सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्यात.