युवासेना वणी विधानसभा क्षेत्र चिटणीस पदी हिमांशु बत्रा यांची नियुक्ती

● शेकडो तरुणांनी बांधले शिवबंधन

0

जितेंद्र कोठारी, वणी: शिवसेना प्रणीत युवासेना वणी तालुका पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी गुरुवारी दि. 29 जुलै रोजी करण्यात आली. यवतमाळ शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांच्या मार्गदर्शनात ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. पदाधिका-यांना युवासेना विस्तारक दिलीप घुगे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा व युवासेना उप जिल्हा प्रमुख कुंदन टोंगे यांच्या नेतृत्वाखाली हिमांशु बत्रा यांची वणी विधानसभा युवासेना चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.

Madhav Medical

कार्यकारिणीत पवन घोंगे यांची तालुका संघटक, आकाश चौधरी- तालुका समन्वयक, अनुप चटप, अक्षय क्षिरसागर व विकी गिरटकर – उपतालुका युवा अधिकारी, तर प्रवीण डोहे, मंगेश तलंडे, निलेश चिंचोळकर, योगेश गोबळे, निखिल वाघाडे व प्रफुल बोर्डे यांची विभाग युवा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी मारेगाव येथील सुरज निब्रडसह अऩेक तरुणांनी शिवबंधन बांधून युवासेनेत प्रवेश केला.

नियुक्ती झालेल्या नवनिर्वाचित पदाधिका-यांना शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, युवासेना विस्तारक दिलीप घुगे, युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. युवासेना ही शिवसेनेची युथ विंग आहे. विद्यार्थी व तरुणाईच्या प्रश्नावर ही कार्यरत असून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात युवासेना कार्य करते.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!