दुचाकीची उभ्या ट्रकला जोरदार धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

मारेगाव येथील पेट्रोलपम्पाजवळ रात्री 8 वाजताच्या दरम्यान अपघात

0

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगावपासून वणी मार्गावर दोन किमी अंतरावर असलेल्या पेट्रोलपम्पजवळ उभ्या ट्रकला दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सदर घटना रात्री 8 वाजताच्या दरम्यान घडली.

सविस्तर वृत्त असे की, प्रकाश दामाजी मडचापे (42) हे मुळचे वणी तालुक्यातील वडजापूर येथील रहिवाशी होते. ते वरोरा येथे एसटी महामंडळात चालक या पदावर नोकरी करायचे. त्यांची पत्नी मारेगाव तालुक्यातील सराटी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका असल्याची माहिती आहे. ते मारेगाव येथील मंगलम पार्क येथे राहत होते.

आज सोमवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी ते संध्याकाळी ड्युटी करून त्यांची दुचाकी अपाचेने (MH34 *8682) वणीहून मारेगावला परतत होते. दरम्यान मारेगावजवळ इंडियन ऑईल पेट्रोलपम्पाजवळ सिमेंटचे पोल वाहून नेणारा ट्रक (MH40 BG6509) उभा होता. या उभ्या असलेल्या ट्रकला प्रकाशच्या दुचाकीने मागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबर होतीकी प्रकाश यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री 8 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला.

ट्रकचे पार्किंग इंडिकेटर बंद ?
पेट्रोल पम्पाजवळ ब-याच वेळापासून सिमेंट पोल वाहून नेणारा ट्रक उभा असल्याची माहिती आहे. अंधार पडल्यानंतरही ट्रकचे पार्किंग इंडिकेटर सुरू नव्हते. त्यामुळे समोरून येणा-या वाहनामुळे दुचाकी चालकाचे डोळे दिपल्याने चालकाने उभ्या ट्रकला धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे.

मृतक प्रकाश यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले असा आप्त परिवार आहे. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

कोलगाव ग्रामपंचायत सरपंचपदी अभीषा राजेंद्र निमसटकर

अडेगाव ग्रामपंचायतीचा ईश्वर चिठ्ठीने फैसला

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.