देशी दारुची तस्करी करताना ग्रामीण रुग्णालयाजवळ एकाला अटक

13 हजारांची देशी दारू जप्त

0

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास वणीच्या ग्रामीण रुग्णालयाजवळ देशी दारुसह एकास अटक करण्यात आली. सदर युवक हा राजूर कॉलरी येथील रहिवासी असून त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवार दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास राजूर कॉलरी येथील सौरभ नगराळे (20) हा अवैधरीत्या दारू घेऊन जात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयाजवळ सौरभ हा एका मोपेडने (MH29 BG493) येताना दिसला. त्याल अडवून तपासणी केली असता गाडीत देशी दारूच्या पेट्या आढळून आल्या. ज्याची किंमत 13 हजार रुपये आहे.

पोलिसांनी दारू व मोपेड वाहन असा एकूण 43000 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही दारू कुठून घेतली याबाबत विचारणा केली असता त्याने जवळच असलेल्या दानव यांच्या देशी दारू दुकानातून घेतली असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पोलीस आता पुढे काय कार्यवाही करते हे बघणे ओत्सुक्याचे आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा:

अडेगाव ग्रामपंचायतीचा ईश्वर चिठ्ठीने फैसला

कोलगाव ग्रामपंचायत सरपंचपदी अभीषा राजेंद्र निमसटकर

Leave A Reply

Your email address will not be published.