निंबाळा येथे जेवण करीत असताना कोसळली घराची भिंत

शेतमजूर दाम्पत्य थोडक्यात बचावले पण मोठे आर्थिक नुकसान

0

जितेंद्र कोठारी, वणी: सततच्या पावसामुळे घराची पक्की भिंत कोसळल्याची घटना बुधवार 21 जुलै रोजी सकाळी 10 वाजता तालुक्यातील निंबाळा (रोड) गावात घडली. या घटनेत घरामध्ये जेवण करीत असलेले शेतमजूर दाम्पत्य थोडक्यात बचावले. मात्र भिंत कोसळल्यामुळे गरीब दाम्पत्याचे मोठे नुकसान झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार निंबाळा येथील शेतमजूर पिसाराम गणपत उईके यांचे घरकुलच्या जागेवर टिनाचे घर आहे. पिसाराम आणि त्यांची पत्नी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. बुधवार 21 जुलै रोजी तालुक्यात सकाळीपासून पावसाची झड लागली होती. पिसाराम उईके व त्याची पत्नी सकाळी 10 वाजता दरम्यान घरात जेवण करीत होते. दरम्यान त्यांच्या घराची विटाने बांधलेली भिंत अचानक भरभरून कोसळली.

भिंत घराच्या बाहेरच्या बाजूने कोसळल्यामुळे उईके दाम्पत्याला कोणतीही इजा झाली नाही. मात्र पावसाच्या दिवसात घराची भिंत पडल्यामुळे त्यांची राहण्याची पंचाईत झाली आहे. उईके दाम्पत्याची परिस्थिती बघता गावकऱ्यांनी त्यांच्या घराआड ताडपत्री लावून पाण्यापासून बचावाची व्यवस्था केली आहे.

भिंत कोसळल्याची घटनेबाबत प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे. तरी प्रशासनाने नुकसान पंचनामा करून गरीब कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

हे देखील वाचा:

स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही त्यांच्या नशिबी नावेतूनच प्रवास

वणीत शिवसंपर्क अभियानांतर्गत कार्यकर्त्यांची बैठक

 

Leave A Reply

Your email address will not be published.