वणीत शिवसंपर्क अभियानांतर्गत कार्यकर्त्यांची बैठक

नगरपालिका निवडणुकीसाठी सेना सज्ज, बैठका व जनसंपर्काला आला जोर

0

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात पंचायत समिती, जिल्हा परिषदा, नगर परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुका आगामी काळात होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेची शिवसंपर्क मोहीम सुरू केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार 12 ते 24 जुलै दरम्यान राज्यात शिवसंपर्क मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियांतर्गत शहरातील माळीपुरा व नारायण निवास येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.

शिवसंपर्क मोहीम अंतर्गत शहरात माळीपूरा व प्रभाग क्रमांक 10 या दोन ठिकाणी शिवसेना युवासेना पदाधिकारी व शाखाप्रमुख, शिवसैनिक युवासैनिक यांची बैठक घेण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले. तर माजी शिवसेना तालुका प्रमुख गणपत लेडांगे, माजी उप जिल्हा प्रमुख राजू देवडे, बंटी सहानी, बंटी येरणे, कुणाल लोणारे, अजू चन्ने, महेश चौधरी हे प्रामुख्याने उपस्थित होते

जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर व युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा यांच्या कार्याला प्रेरीत होऊन अनेक युवकांनी या बैठकीत शिवबंधन बांधून युवासेनेत प्रवेश केला. यावेळी सचिन पाटील, राजू गोलाईत, निखिल सोनटक्के, शुभम लेनगुरे, उमेश लेनगुरे, राहुल लोणारे, सनी गोलाईत ,अमित चौधरी, अनिकेत भेंडाले व त्या वॉर्डातील शाखाप्रमुख व महिला, पुरुष व युवा शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन युवासेना शहर संघटक कुणाल लोणारे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सौरभ खडसे यांनी केले तर आभार अनुप चटप यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.