तालुका प्रतिनिधी, वणी: राज्यात टाळेबंदीची मुदत 31 मे 2020 च्या मध्यरात्री पर्यंत वाढविलेली आहे. यवतमाळ जिल्हा नॉन रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला. त्यानुसार यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी 20 मे रोजी आदेश काढून सुधारीत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
सदर पत्राच्या अनुषंगाने लग्न समारंभाच्या कार्यक्रमास वेगळ्या परवानगीची गरज असणार नाही. परंतु लग्न समारंभाला किंवा अंत्यविधी प्रसंगी 50 पेक्षा जास्त व्यक्तीला उपस्थित राहता येणार नाही. लग्नकार्य सकाळी 7•00 ते सायंकाळी 5•00 वाजताच्या कालावधीत पार पाडावे लागेल. तसेच सामाजिक अंतराचे अर्थातच शारीरिक अंतराचे पालन करावे लागेल.
अनेक गावांतील पोलीस पाटील किंवा सरपंच लग्न कार्यासाठी पोलीस परवानगी काढण्याच्या सूचना संबंधितांना देत आहेत. त्यामुळे लग्न घरच्या मंडळींना विनाकारण मानसिक आणि शारीरिक त्रास होत आहे.