अमानुषता…. महिलेच्या डोक्यावर हातोड्याने प्रहार

● महिलेची प्रकृती गंभीर, शुल्लक भांडणाचा क्रुरतेतून वचपा

0
Mayur Marketing

विवेक तोटेवार, वणी: शराततील बीएसएनएल ऑफिस जवळ राहणाऱ्या एका महिलेस युवकाने हतोडीने डोक्यावर वार करून जखमी केल्याची घटना घडली. सदर महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहे. महिलेच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

शारदा राहुल शिरसार (35) ही वणीतील बीएसएनएल ऑफिस जवळ राहते. तिचे दोन दिवसांपूर्वी मंगेश उर्फ भुऱ्या विलास डाखरे (23) रा. पळसोनी याच्यासोबत बसस्थानक परिसरात भांडण झाले. या भांडणाचा वचपा काढण्याचे मंगेशने ठरवले.

Lodha Hospital

तो आज दिनांक 14 सप्टेंबर सोमवारी सकाळी 10.30 वाजता शारदाच्या घरी गेला. तिथे जाऊन त्याने तिच्या डोक्यावर हतोडीने प्रहार केला. या घटनेत शारदाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. शारदाने त्वरित पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दिली.

पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध कलम 326 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारदाला जखमी अवस्थेत वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रक्तस्राव अधिक झाल्याने तिला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले.

स.पो. जगदीश बोरणारे व पोकॉ सागर सीडाम यांनी आरोपीचा शोध घेत घेत त्याला सायंकाळी 8 वाजताच्या दरम्यान अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पोऊनि प्रताप बाजड करीत आहे.

(वणी मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!