ट्रॅक्टरची दुचाकीला धडक, एक जागीच ठार

ईसार पेट्रोल पंपासमोरील घटना

0
Mayur Marketing
नागेश रायपुरे, मारेगाव : करंजी दिशेने जात असलेल्या एका ट्रॅक्टर वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मारेगाव शहरापासून 3 की.मी.अंतरावर असलेल्या ईसार पेट्रोल पंपा समोर सोमवारी रात्री 7.30 वाजता दरम्यान घडली.बळीराम हरी गुंजेकर (48) रा. बुरांडा (खडकी) असे अपघातात जागीच ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
 प्राप्त माहिती नुसार मृतक बळीराम मारेगाव येथे काही कामानिमित्त आलेत. काम आटोपून आपली TVS व्हिक्टर कंपनीची दुचाकी (MH 29 8455) ने गावा कडे परत जात असताना, दुचाकीच्या मागून येत असलेल्या ट्रेकटर ( MH 29 C 4514) या वाहनाने दुचाकीला मागून धडक दिली.यात दुचाकीस्वार बळीराम जागीच ठार झाला.
.घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना मिळताच,पो.जमादार आनंद अचलेवार, शिपाई बंटी मेश्राम, वाहतूक शिपाई नितीन खांदवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.
Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!