चोरट्यांनी एकाच व्यक्तीच्या दोन्ही घरांवर साधला डाव

आधीच्या गुन्ह्याची उकल होण्याआधी पुन्हा लाखांचा डल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: वेकोलि कर्मचारी असलेल्या एका व्यक्तीच्या दोन्ही घरांवर चोरट्यांनी डाव साधला आहे. डिसेंबर महिन्यातील घरफोडीचा धक्का सावरत नाही, तोच यांच्या सुंदरनगर येथील घरी घरफोडी झाली आहे. आधीच्या घरफोडीत त्यांचे 5 लाखांचे नुकसान झाले होते तर आता चोरट्यांनी 1 लाखांचा डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे आधीच्या गुन्ह्य़ाची उकल होण्याआधीच भुसारी यांच्यावर आलेलं दुहेरी संकट सध्या परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. निरंतर पाळत ठेवून आणि योजना आखून ह्या घरफोड्या झाल्या असाव्यात अशी सर्वत्र चर्चा आहे.

गोपाल बाळकृष्ण भुसारी हे सुंदरनगर येथील वेकोलिच्या क्वॉर्टरमध्ये राहतात. तसेच त्यांचे वणीतील जिल्हा परिषद कॉलनीतही घर आहे. सुंदरनगर येथील त्यांच्या क्वॉर्टरमध्ये सोमवारी दिनांक 3 फेब्रुवारी रोजी दिवसाढवळ्या जबर चोरी झाली. ही घटना सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. त्यात चोरट्यांनी घराच्या दरवाज्याची कुंडी तोडून आत प्रवेश केला व घरातील 24 ग्रॅम सोने (किंमत 58 हजार) व रोख 40 हजार अशा 98 हजारांच्या ऐवजांवर चोरट्यांनी डल्ला मारला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

भुसारी यांनी सोमवारी रात्री शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात 305 (a) आणि 331 (4) BNS नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

एकाच व्यक्तीला दोन महिन्यात दुसरा धक्का
6 डिसेंबरच्या रात्री भुसारी यांच्या वणीतील जिल्हा परिषद कॉलोनी येथील घरात चोरी झाली होती. या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे 5 लाखांचा डल्ला मारला होता. अद्याप या घटनेतील आरोपी चोरटे पोलिसांना गवसले नाही तोच आता पुन्हा दुसरा धक्का भुसारी यांना बसला आहे. आता चोरट्यांनी त्यांना 1 लाखांचा हिसका दाखवला आहे. याची सध्या परिसरात चांगलीच चर्चा रंगत आहे.

ट्रकची दुचाकीला मागून धडक, तरुण जागीच ठार

Comments are closed.