विवेक तोटेवार, वणी: शहरातील टागोर चौकात असलेल्या पोस्ट ऑफिस (उपडाकघर) चोरट्यांनी फो़डले. मात्र ऑफिस मध्येपैसे नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले. पोस्ट मास्तर यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोस्ट मास्तर नागोराव गोविंदराव दुबे हे वणीच्या पोस्ट ऑफिस मध्ये कार्यरत आहेत. 11 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास कर्मचारी सुरेश येसेकर यांनी पोस्ट ऑफिसचे शटर बंद केले व कुलूप लावून ते घरी गेले. दुसऱ्या दिवशी 12 जून रोजी सकाळी सफाई कामगार यांना पोस्ट ऑफिसच्या खिडकीची ग्रील कापलेली दिसली. त्यांना चोरीचा संशय आला.
सफाई कामगाराने त्वरित याबाबतची माहिती पोस्ट मास्तर दुबे यांना दिली. दुबे यांनी येऊन बघितले असता ग्रील कापून असल्याचे दिसून आले. त्यांनी ऑफिस उघडून बघितले असता ऑफिस मध्ये लाकडी अलमारी तोडलेली होती, ड्रावर उघडे होते. परंतु चोरी काहीच गेले नसल्याची खात्री करून घेतली.
या प्रकरणी पोस्ट मास्तर यांनी वणी पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम 457, 380, 511 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
वणी शहरात असलेले गाडगेबाबा चौक येथे असलेले उपडाक घर काही काळापूर्वी टागोर चौक येथे हलवण्यात आले आहे. या पोस्टऑफिसमध्ये येणारी रक्कम ही त्याच दिवशी बँकेत जमा केली जाते. त्यामुळे चोरट्यांच्या हाती काही लागले नाही व त्यांना हात हलवत परतावे लागले.
हे देखील वाचा:
[…] चोरट्यांनी फोडले वणीतील पोस्ट ऑफिस […]
[…] चोरट्यांनी फोडले वणीतील पोस्ट ऑफिस […]