टाकळी येथे वाघाचा शेतमजुरावर हल्ला

झरी तालुक्यात वाघ झाला आक्रमक

0

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील टाकळी येथील मजुरावर वाघने हल्ला करून जखमी केले. टाकळी येथील अर्जकवडा शेतशिवरात गजानन बतूलवार यांच्या शेतात मजूर कापूस वेचणी करत असताना वाघाने झडप घातली. यामध्ये ते थोडक्यात बचावले. यामध्ये त्यांचे शर्ट फाटले व पोटाला जखम झाली.

Podar School 2025

यावेळी सोबत 10-15 मजूर असल्याने एकाच वेळी आरडाओरडा केल्याने वाघाने पळ काढला. जाताना आणखी दुसऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु म्हणतात ना ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीप्रमाणे कुठलीच इजा किंवा मोठी जखम झाली नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

याबाबत माहिती मिळताच पोलीसपाटील दशरथ बुर्रेवार यांनी लगेच वनविभागास कळविले. अर्ध्या तासाच्या आत वनविभागाची चम्मू हजर झाली. यावेळी परिसर पिंजून काढला. वाघाच्या पाऊलखुणा पाहून खात्री करण्यात आली.

वनविभागातर्फे वनपरिक्षेत्र अधिकारी मेहरे, सोनोने उपस्थित होते. यावेळी त्यांनी 3 वॉचमन यांना सदर शेतशिवारात गस्त घालण्यासाठी पाठवले. यावेळी पोलीस पाटील यांनी पोलीस प्रशासनास कळविले. पोलीस स्टेशन पाटणचे ठाणेदार अमोल बारापात्रे यांनीसुद्धा भेट देऊन सर्व विचारपूस केली. यावेळी परिसरातील सर्व मजूर घराकडे परत येताना दिसले.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.