बंदीवाढोना येथे वाघाचा धुमाकुळ, 3 वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला

तिघे जखमी, एक तरुणाची शिताफिने वाघाच्या तावडीतून सुटका

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बंदीवाढोना शेतशिवारात रविवारी वाघाने धुमाकुळ घातला. यात वाघाने हल्ला करून तिघांना जखमी केले. वेगवेगळ्या ठिकाणी झालेली ही घटना दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान घडली. दोन हल्ल्यातील पीडित गंभीर जखमी असून तिस-या घटनेत तरुणाने शिताफिने वाघाच्या तावडीतून सुटका केल्याने तो किरकोर जखमी झाला आहे. दरम्यान वाघाला शोधण्यासाठी लोकांनी लाठी काठी घेऊन एकच गर्दी केली होती. तिनही जखमींना यवतमाळ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, बंदीवाढोना येथे रामदास भीमा कुमरे यांचे शेत आहे. दुपारी 3 वाजताच्या सुमारास कुमरे यांच्या शेतात गावातीलच पैकु मडावी (35) हा ज्वारीला पाणी देण्याकरिता गेला. दरम्यान तिथे आधीपासूनच एक वाघ दबा धरून होता. वाघाने पैकुवर अचानक हल्ला केला. यात पैकु मडावी याच्या डोक्यावर पायावर व पाठीवर गंभीर जखमा झाल्यात.

वाघाने हल्ला केल्याची माहिती बाजूच्या शेतकऱ्यांना मिळताच त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे वाघ निघून गेला. जखमी पैकुला याला गावातील उपसरपंच उमेश राठोड, जाबीर सैय्यद, प्रवीण चव्हाण व हुसेन मडावी यांनी खासगी गाडीने पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले.

काही वेळातच वाघाचा पुन्हा दोघांवर हल्ला
वाघ शेतात असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळताच लोकांची वाघाला शोधण्यासाठी एकच गर्दी उसळली. त्यानंतर अर्ध्या तासाने काही आधीच्या हल्ल्याच्या काही अंतरावरच मासे पकडण्याकरिता गेलेल्या प्रकाश आत्राम (40) याच्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात प्रकाशच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. दरम्यान काही वेळातच परिसरातीलच अजय आत्राम (22) यांच्यावरही वाघाने हल्ला केला परंतु अजय वाघाच्या तावडीतून सुटून पळण्यात यशस्वी झाला. अजय याला किरकोळ जखमा झाल्या आहेत.

तिन्ही जखमींना पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना यवतमाळ येथे रेफर करण्यात आले. परंतु रुग्णालयात एमबुलन्स हजर नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागला. जंगला लगत असलेल्या शेतकरीकरिता वनविभागाने सुविधा देणे आवश्यक असताना त्या ठिकाणी वनविभागाचे एकही कर्मचारी नव्हते. जखमी शेतकऱ्यांना नेण्याकरिता वनविभागांने एम्बुलन्स किंवा इतर सुविधा न दिल्याने संताप व्यक्त होत आहे.

रविवारी सकाळीच चिंचघाट शेतशिवारात वाघाने हल्ला करून दोन बैलांना फडशा पाडला होता. त्यानंतर दुपारी 3 नंतर वाघाने बंदीवाढोना शेतशिवारात तिघांवर हल्ला केला आहे. महिनाभरात वाघाने जनावरांवर केलेल्या हल्ल्याच्या घटना सातत्याने पुढे येत असताना आता वाघांनी आता मानवांवरही हल्ला करणे सुरू केले आहे. झरी तालु्क्यात वाघाच्या सततच्या हल्ल्यामुळे नागरिक दहशतीत आले आहे.

हे देखील वाचा:

दामले फैल येथे कोरोनाचा शिरकाव

वाघाच्या हल्ल्यात 2 बैलांचा मृत्यू, चिंचघाट शिवारातील घटना

Leave A Reply

Your email address will not be published.