वाघाच्या हल्ल्यात 2 बैलांचा मृत्यू, चिंचघाट शिवारातील घटना

झरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्याच्या घटनेत सातत्याने वाढ

0

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील जंगलाच्या परिसरात वाघाच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात एका पशुधनावर हल्लाची घटना ताजी असतानाच आज सकाळी पुन्हा एक घटना उघडकीस आली. चिंचघाट येथील शेतशिवारात वाघाने दोन बैलांवर हल्ला केला. यात दोन्ही बैलांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की माणिक बोरुले यांचे चिंचघाट परिसरात शेत आहे. शनिवारी दुपारी त्यांनी बैलांना चरण्यासाठी शेत शिवारात सोडले होते. नेहमी प्रमाणे बैल संध्याकाळी घरी परततात मात्र बैल संध्याकाळपर्यंत परत आले नाही. अंधार झाल्यामुळे त्यांनी सकाळी बैलांचा शोध घेण्याचे ठरवले.

आज सकाळी बैलांचा शोध घेत असता त्यांना चिंचघाट शेतशिवारातील कुमरे यांच्या शेतात त्यांचे दोन्ही बैलांवर वाघाने हल्ला केला व त्यात ते मृत झाल्याचे आढळून आले. पशुपालक बोरुले यांनी याची तात्काळ माहिती वनविभागाला दिली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व घटनेचा पंचनामा केला. सदर बैलाची किंमत सुमारे 70 हजार आहे. बोरुले यांच्याकडे असलेले दोन्ही बैल वाघाच्या हल्ल्यात ठार झाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

हे देखील वाचा:

झरी तालुक्यातील मटका जुगारावर एलसीबी पथकाचे धाडसत्र

नुकतेच MBBS डॉक्टर झालेल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Leave A Reply

Your email address will not be published.