मछिंद्रा येथे गाय व गो-ह्यावर वाघाचा हल्ला

हल्ल्यात गो-हा ठार तर गाय जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: शेतातील गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर वाघाने हल्ला करून गोऱ्हाला ठार केले. तर वाघाच्या हल्ल्यात गाय जखमी झाली. मारेगाव तालुक्यातील मछिंद्रा येथे रविवार 30 जानेवारीच्या रात्री दरम्यान ही घटना घडली.

Podar School 2025

मछिंद्रा येथील शेतकरी प्रमोद माधवराव शेरकी यांचे फिस्कीच्या जंगलालगत शेत आहे. नेहमीप्रमाणे रविवार 30 जाने. रोजी आपल्या शेतातील गोठ्यात जनावरे बांधून प्रमोद घरी आला. सोमवार 31 जानेवारी रोजी सकाळी प्रमोद शेतात गेला असता ही घटना उघडकीस आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वाघाच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार झाल्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. पीडित शेतकऱ्यांनी याबाबत वनविभागाला कळविले असून नुकसान भरपाईची मागणीही केली आहे.

Comments are closed.