जेसीआय पदग्रहण सोहळा संपन्न: रवी हनुमंते अध्यक्ष तर नवीन पोपली सचिव

श्रीराम मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

विवेक तोटेवार, वणी: शनिवार 12 फेब्रुवारी रोजी जेसीआय वणी सिटीचा पदग्रहण सोहळा सायंकाळी 8 वाजता रसोया हॉटेलमध्ये संपन्न झाला. या 9 व्या पदग्रहण सोहळा मध्ये जेसी रवी हनुमंते यांनी अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला तर सचिवपदी नवीन पोपली यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्षपदी गौरव खुंगर यांची निवड करण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

श्री राम मंदिरात रक्तदान शिबिर
कार्यक्रमादरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम हा श्री राम मंदिर येथे घेण्यात आला. रक्तदान शिबिरात 44 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सौरभ बरडीया व अनुप गांधी यांची उपस्थिती होती.

जेसीआय ही संस्था गेल्या 9 वर्षांपासून वणी शहरात कार्यरत आहे. जेसीआयतर्फे बस स्थानक येथे पाण्याची टँक भेट देण्यात आली आहे. अन्न दान, कपडे दान, महिलांकरिता कार्य, आरोग्य तपासणी इत्यादी सामाजिक इत्यादी सामाजिक कार्य जेसीआयतर्फे करण्यात आले आहे.

 

Comments are closed.