देव येवले, मुकुटबन: झरी तालुक्यातील अर्धवन शिवारात वाघाची दहशत कायम असून, वाघाचा व अन्य वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी अर्धवनच्या नागरिकांनी केली आहे. वाघाच्या दहशतीमुळे तसेच अन्य प्राण्यांमुळे शेतमालाचे नुकसान होत आहे, शेतमालाचे नुकसान टाळण्याकरीता सोमवारला अर्धवनच्या नागरिक निवेदन द्यायला गेले. मात्र मुकुटबन येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात संबंधित अधिकारी गैरहजर असल्यामुळे त्यांनी वनरक्षक रोकडे यांना निवेदन दिले.
अर्धवन शिवारात सतत होणाऱ्या वाघाच्या दर्शनाने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. हल्ली कापसाची वेचनीचे दिवस असल्याने मजुरांची आवश्यकता असते. मात्र वाघाच्या दहशदीने मजूर वर्गात चांगलीच दहशत असल्याने मजूराचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे शेतमालाचेही चांगलेच नुकसान होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्थानिकांचा वनविभागावर रोष असून तातडीने कुठलीही जीवित हानी होण्यापुर्वी वन्यप्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनात केली आहे.
यावेळी चेतन मॅकलवार, प्रफूल भोयर, राजू मॅकलवार, राकेश गिसावार, राहूल बोलपेलवार, श्रीनिवास मॅकलवार, विजय चिटपेल्लिवार, नकुल सितर्लावार, आदी सह अनेक युवक उपस्थित होते .
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Prev Post