निंबादेवी परिसरात वावरणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करा

भयभीत ग्रामवासीयांची उपवनसंरक्षक यांच्याकडे तक्रार

0

सुशील ओझा, झरी: गेल्या अनेक दिवसांपासून निंबादेवी भागात वाघाचे हल्ले वाढल्यामुळे नागरिकात भितीचे वातावरण आहे. त्यामुळे प्रशासनाने वाघांचा बंदोबस्त करावा अशी मागणी निबादेवीच्या उपसरपंच व इतर नागरिकांनी उपवनसंरक्षक पांढरकवडा यांच्या कडे केली आहे .

काही दिवसांपूर्वी पिवरडोल येथे वाघाने हल्ला करून तरुण युवकाचे लचके तोडत 4 तास वाघाने शिकारी जवळ ठिय्या मंडल्याची घटना ताजी असतानाच 1 ऑगस्टला निंबादेवी गावालगत 100 मीटर अंतरावर वाघाने गो-ह्याची शिकार केली व कारेगाव शिवारात गायीचा फडशा पाडला. त्याच रात्री पुन्हा निंबादेवी गावात विष्णू टेकम याच्या घराजवळ आला होता.

सलग दोन दिवशी दोन शिकार आणि निंबादेवी गावालगतच वाघाचा संचार या मुळे परिसरात नागरिक व शेतकऱ्यांत पुन्हा एकदा वाघाची दहशत निर्माण झाली आहे. पिवरडोल येथील हल्लेखोर वाघा चे स्थलांतर करण्यात आले असले तरी परिसरात पुन्हा वाघांचा मुक्त संचार आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहे.

शेतकरी, मजुरदार शेतात जाण्यास भीत आहे. आत्ताच शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांनी शेतामध्ये कर्ज काढून शेतीमध्ये पैसे गुंतवले आहे. आधीच शेतकरी अर्थीक अडचणी चा सामना करतोय आणि त्यातच वाघाचीभीती या मुळे शेतकऱ्याचा जीव टांगणीला लागला आहे. जंगलालगत शेतात जाऊन कामे करण्यास शेतकरी भीत आहे. वाघ कधीही पाळीव जनावर व ग्रामस्थांवर हल्ला करू शकतो. यामुळे जंगलालगत तार किंवा जाळीचे 10 फूट कुंपण करावे वाघाला जेरबंद करून इतरत्र हलवावे.

वाघाचा बंदोबस्त करावा वाघ व मानव संघर्षामध्ये वाघाला जीवित हानी झाल्यास गावकरी जबाबदार राहणार नाही असे मागणी वजा निवेदन उपसरपंच अशोक शेरलावर, अनिल पाटील भीमराव टेकाम गणेश आडे नितीन आत्राम चेतन सुडदेवर, गजानन धुर्वे ,राजू सुद्देवार सुरेश आत्राम यांनी उवनसंरक्षक पांढरकवडा याना देण्यात आले आहे.

हे देखील वाचा:

गाडेघाट येथील अंगणवाडी सेविकेची त्वरित बदली करा

नेहा खोटले (काळे) यांना आचार्य पदवी प्रदान

Leave A Reply

Your email address will not be published.