नेहा खोटले (काळे) यांना आचार्य पदवी प्रदान

भौतिकशास्त्र या विषयात केले होते संशोधन

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन येथील नेहा खोटले (काळे) यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून आचार्य पदवी प्रदान करण्यात आली आहे. भौतिकशास्त्र हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. सिंथेसिस अँड कॅरेक्टरायझशन ऑफ इरिडीयम कॉम्प्लेक्स फॉर फॅब्रिकेशन ओएलइडीज या शिर्षकाअंतर्गत त्यांनी संशोधन केले होते व शोधप्रबंध सादर केला होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

संशोधनास मार्गदर्शक म्हणून डॉ. एस जे ढोबळे भौतिक शास्त्र विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांनी मार्गदर्शन केले. नेहा खोटले ह्या मुकूटबन येथील डॉ स्वप्नील प्रमोद काळे यांच्या पत्नी असून नेहाच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.