अखेर टिळक चौकातील ‘तो’ खड्डा बुजविला

0

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरातील टिळक चौकात गेल्या अनेक दिवसांपासून पाइपलाइनच्या कामाकरिता खड्डा खोदण्यात आला होता. काम पूर्ण होऊनही खड्डा बुजवण्यात आला नव्हता. याकरिता आंदोलन, निवेदन झाले परंतु काम झाले नाही. गुरुवारी सायंकाळी सदर खड्डा बुजविण्यात आला. शिवाय पडलेल्या मातीने उंच खाली झालेला रस्ता सपाट करण्यात आला.

वणी तालुक्यात गुरुपौर्णिमेला मोठी मिरवणूक काढण्यात येते. सदर मिरवणूक ही यवतमाळ रोडवर स्थित साई मंदिरातून काढण्यात येऊन शहरातील विविध भागात जात असते. मिरवणुकीत साई बाबांची पालखी, बँड व भजनाच्या तालासुरात वणीतील चौकात फिरविण्यात येत असते. या मिरवणुकीत भक्तांची मांदियाळी असते. सदर मिरवणूक ही टिळक चौकातूनच शहरात दाखल होते. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून वणीकरांची जी फार मोठी समस्या बनून होती. ती नगर परिषदेद्वारे सोडविण्यात आली.

गुरुपौर्णिमा निमित्त का होईना पण रस्त्याला ‘अच्छे दिन’ आले असे म्हणता येईल. पाइपलाइन चे काम पूर्ण होऊन तो ते तीन महिने लोटल्यानंतरही जे काम होऊ शकले नाही. ते काम अखेर मिरवणुकीमुळे पूर्ण झाले. नगर परिषद प्रशासन इतके का निष्क्रिय झाले आहे. याबाबत जनता आता सवाल उपस्थित करते आहे. केंद्र, राज्य व वणीत सत्ता असतानाही सुधारणा पासून शहर वंचित का? असा सवाल जनतेत उपस्थित होत आहे.

टिळक चौकातील या खड्ड्याबाबत वणीत सर्व पक्षद्वारे बेशरम आंदोलन करण्यात आले होते. इतकी मोठी बाब असतांनाही प्रशासनाची सुस्ती कायम होती. या खड्याच्या सभोवताल बेशरमाची झाडे लावून प्रदर्शन करण्यात आले होते. परंतु नगर परिषद प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. गुरुवारी मात्र दुसऱ्या दिवशी साई बाबाची मिरवणूक निघणार म्हणून खड्डा बुजवून रस्ता सुधारण्यात आला. परंतु ही सुधारणा म्हणजे तात्पुरती आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. आता प्रशासन केव्हा पक्का उपाय करणार याकडे वणीकर जनतेचे लक्ष लागले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.