सुनीइ इंदुवामन ठाकरे, वणीः लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बुधवार 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक महाविद्यालयाय सायंकाळी व्याख्यान होणार आहे. शिक्षण प्रसारक मंडळाचे हे दरवर्षी आयोजन असते. ‘‘आज लोकमान्य असते तर’ या विषयावर नागपूर येथील विवेक घळसासी व्याख्यान देतील.
स्थानिक लोकमान्य टिळक स्मृती न्यासाने आपले सभागृह आणि जागा शिक्षण प्रसारक मंडळाला हस्तांतरित करताना, महाविद्यालयाचे नाव लोकमान्यांच्या नावाने असावे आणि प्रतिवर्षी लोकमान्यांच्या स्मृतीत लोकमान्यांशी संबंधित विषयावरच व्याख्यानाचे आयोजन व्हावे, अशा प्रगट केलेल्या दोन इच्छांनुसार प्रतिवर्षी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या व्याख्यानाचे ५४ वे वर्ष असून या वर्षीचे पुष्प संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही जिथे जिथे मराठी माणूस आहे तेथे तेथे अमृत वक्ता रूपात सुप्रसिद्ध असलेले विवेक घळसासी गुंफणार आहेत.
या व्याख्यानाला उपस्थित राहण्याची विनंती शिप्रमंचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला, उपाध्यक्ष सुभाष देशमुख, सचिव लक्ष्मण भेदी, सहसचिव अशोक सोनटक्के, सदस्य कांतीभाई जोबनपुत्रा, प्रमोद देशमुख, उमाकांत कुचनकार, प्रा. अरविंद गोरंटीवार, रमेश बोहरा, नरेंद्र बरडिया, नरेंद्र ठाकरे व सुधीर दामले यांनी केली आहे.