टमाटर शेतीतुन समृद्ध झाला केगाव येथील शेतकरी
शेतकऱ्याची यशोगाथा: सव्वा एकरात मिळवलं आठ लाखांचं उत्पन्न
ज्योतिबा पोटे, मारेगाव:संपूर्ण तालुक्यात बोंड अळीचा प्रकोप असताना त्यावर मार्ग काढत किंवा पर्याय शोधण्याची अनेक शेतकऱ्यांना आवड असते. मारेगाव तालुक्यातील केगाव येथील एका शेतकाऱ्याने सव्वा एकरात लाखो रूपयांचे टमाटरचे उत्पन्न घेत इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. पारंपरिक शेती कसत असताना निसर्गाच्या लहरीपणामुळे सततची नापिकी होत होती. मात्र हताश न होता आधुनिक शेतीच्या अवलंब करुण ते टमाटर व आधी भाजीपाला पिकात सुद्धा लाखोंचे उत्पन्न घेत आहे. केगाव (वेगाव) येथील देवराव ठावरी व यांचा मुलगा युवा शेतकरी राहुल व प्रफुल्ल ठावरी यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
मारेगाव तालुक्यातील केगाव येथील देवराव ठावरी यांच्या कड़े आठ एकर शेती आहे. पारंपरिक शेती कसत असताना यात सतत नापिकी व्हायची. मात्र नापिकीला न कंटाळता त्यांनी कृषि विभागाच्या मार्गदर्शनत आधुनिक शेती पद्धतिचा अवलंब केला. दोन वर्षांपासून ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती करीत आहे. चालू हंगामात ठावरी यांनी आठ एकर शेतजमिनीपैकी सव्वा एकरात टमाटर, दीड एकरात फुलकोबी, पालक, पत्ताकोबी, सांभार तर अर्धा एकरात चना, तर उर्वरित क्षेत्रात कपाशी आणि गहुची लागवड़ केली.
बोंड अळीच्या प्रयकोपाने कापशीचे पिक होरपळुुन गेले. मात्र टमाटरचा पर्याय असल्याने या पिकाने त्यांना तारले. त्यांनी सव्वा एकरात ठिबक सिंचन, प्लास्टिक मल्चिंग सह यांत्रिक अवजारे, प्रकाश सापळेे, पिवळे चिकट सापळे, कामगंध सापळे, इत्यादीचा वापर करत सोबतच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने एकात्मीक व जैविक कीड व्यवस्थापनाचा अवलंब केला.
पाच फुटाच्या साऱ्या मधे 1/4 फुटावर लागवड जुलै मध्ये केली. ऑगस्ट महिन्यापासून टमाटरच्या उत्पन्नला सुरुवात झाली. एका टमाटरचे वजन जवळ जवळ 70 ते 80 ग्राम असून आठ दिवसापर्यंत ते ताजे राहते असे शेतकरी पुत्र राहुल ठावरी यांनी सांगितले. युवा शेतकरी राहुल व प्रफुल ठावरी यांच्या मेहनतीला रंग येऊन तालुका कृषि अधिकारी राकेश दासरवार यांच्या वेळोवेळी लाभलेल्या मार्गदर्शनमुळे पन्नास गुंठ्यात आधुनिक पद्धतीने लावलेल्या टमाटरच्या लागवड़ीसाठी व आदी साठी लागलेल्या सव्वा लाखांचा खर्च वजा करता जवळपास आठ लाखांचे उत्पन्न केवळ टमाटर या पिकामधे झाले असव्याचे त्यांनी ‘वणी बहुगुणी’ जवळ सांगितले.
आधुनिक शेतीचा अवलंब तालुक्यातील इतर शेतकर्यांनीही घ्यावा. आपणही निसर्गाच्या लहरीपणावर मात करु शकतो. शेती व्यवसायात भरभराट करावी असे शेतकऱ्यांना वाटत असले तरी नुसते टमाटरचे उत्पन्न घेऊन चालणार नाही. जर आधुनिक पद्धतीने शेती केली तरच शेतकरी वाचू शकतो अन्यथा आत्महत्या होतच राहतील. – राहुल आणि प्रफुल्ल ठावरी