नांदेपेरा रोड रेल्वे क्रॉसिंगवर वाहतुकीचा खोळंबा

उड्डाणपूल बनविण्याची नागरिकांची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: येथील नांदेपेरा मार्गावर असलेल्या रेल्वे क्रॉसिंगमुळे दररोज तासंतास वाहतुकीचा खोळंबा होत आहे. वणी मुकुटबन आदिलाबाद तसेच वणी ते राजूर (कॉलरी) जाणाऱ्या दोन्ही रेलमार्गावर असलेली फाटक दिवसभरात अनेक वेळा बंद राहते. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुचाकी व चारचाकी वाहनांच्या रांगा लागून वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या मार्गावर असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही फाटक बंद असल्याचा फटका बसत आहे.

शहरातील नामांकित लॉयन्स इंग्लिश मिडीयम, स्वर्णलीला इंटरनेशनल व मॅकरून स्टुडेंट अकॅडमी शाळा याच मार्गावर आहे. सकाळी 10 वाजता व सायंकाळी 4 वाजता दरम्यान रेल्वे गेट बंद राहत असल्यामुळे शाळेत जाताना व शाळा सुटताना नेहमी उशीर व्हावा लागत असे. याशिवाय सोयाबिन फॅक्टरी, वनोजा देवी, नांदेपेरा, मार्डी इत्यादी गावाला जाण्यासाठी देखील याच मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. नांदेपेरा मार्ग रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूलची मागणी मागील अनेक वर्षांपासून नागरिक करीत आहे.

राजूर (कॉलरी) कोलमाईन्स बंद झाल्यामुळे राजूर रेल्वे लाईनवर रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. तसेच कोरोना काळात प्रवासी रेल्वे गाड्यासुद्दा बंद करण्यात आली होती. मात्र मागील 2-3 महिन्यापासून या दोन्ही रेल्वे मार्गावर धनबाद -कोल्हापूर, पूर्णा- पाटणा या प्रवासी एक्सप्रेस रेल गाड्यांसह कोळसा वाहतूक करणाऱ्या मालगाड्यांची दिवस भर ये-जा सुरु आहे. त्यामुळे दिवसभरातून अनेकदा या रस्त्यावरील रेल गेट बंद ठेवण्यात येते.

विशेष म्हणजे राजूर लाईनवरील धावणाऱ्या कोळसा वाहतूक रेल्वे गाड्या सिग्नलच्या अभावी अर्धा ते एक तास रेलगेटवर येऊन अडकून जात आहे. त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच दमछाक होत आहे. गेटच्या दोन्ही बाजूने शेकडो वाहनांची रांगा लागून वाहन काढताना वाद होत आहे. तसेच पायदळ जाणारे अनेक नागरिक आपला जीव धोक्यात घालून उभ्या रेल्वेच्या दोन डब्यांच्या मधून उडी मारून रस्ता पार करीत आहे.

हे देखील वाचा:

प्रेमसंबंधातून पैसे घेतले उधार, पैसे मागताच प्रेयसी झाली गद्दार

मोमिनपुरा येथे चिमुकल्यावर अॅसिड अटॅक

दारुच्या पव्व्याने केला घात, अपघातात काच पोटात जाऊन तरुणाचा मृत्यू

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.