वणी तहसील कार्यालय परिसरात ‘ट्रॅफिक जाम’ 

न्यायालय व शासकीय कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था

0

 जितेंद्र कोठारी, वणी : येथील तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी दुचाकी वाहने उभी असल्यामुळे दररोज ट्रॅफिक जाम’ होत आहे. कार्यालयीन दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या परिसरात नेहमी वाहतुकीची कोंडी असते.

Podar School 2025

या परिसरात तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्र, न्यायालय, पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम विभाग व इतर कार्यालय आहे. वणी शहर व तालुक्यातून शासकीय कामासाठी या परिसरात दिवसभरात हजारोंच्या संख्येने नागरिकांची वर्दळ असते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मुख्य रस्त्यापासून जि. प. बांधकाम विभाग कार्यालयापर्यंत अनेक वर्षांपूर्वी 3 मीटर रूंदीचा डांबरी रस्ता बनविण्यात आला होता. हा रस्ता आता नाममात्र शिलक राहिला असून जागो जागी खड्डे पडलेत. मुख्य रस्त्यापासून पोलीस स्टेशनपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी तसेच तहसील कार्यालयाच्या अगदी समोर शेकडो दुचाकी वाहने अस्ताव्यस्त लावलेली असतात.

अलीकडेच वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करून जप्त केलेले ट्रकदेखील तहसील कार्यालयासमोरच उभे करण्यात आलेत. त्यामुळे वाहतूकीच्या कोंडीत भर पडली आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनचालकांना फक्त 50 मीटरचा रस्ता पार करताना तारेवरची कसरत करावी लागते.

एसडीपीओ, वाहतूक शाखा प्रमुख, ठाणेदार, एसडीओ, तहसीलदार व इतर सर्व अधिकारी गर्दीतून मार्गक्रमण करून कार्यालयात पोहचतात. मात्र रस्त्यावरील अतिक्रमणे काढून वाहतूक सुरळीत करण्याकडे कोणाचेही लक्ष जात नाही.

सपोनि संग्राम ताटे यांच्याकडे वाहतूक शाखाचे पदभार असताना त्यांनी काही प्रमाणात या मार्गावरील वाहतुकीस रस्ता मोकळा केला होता. परंतु आता तर पोलीस ठाण्यापर्यंत पायी जाणेदेखील अवघड होत आहे. मुख्य रस्त्यापासून तर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत रुंदीकरणासह सिमेंटरोडचे बांधकाम तसेच पार्किंग झोन तयार करण्याची नागरिकांची मागणी आहे.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

शिरपूर-मेंढोली फाट्यादरम्यान अपघात, महिलेचा जागीच मृत्यू

Leave A Reply

Your email address will not be published.