पोलिसांशी हुज्जत घातल्याने पोलीस पाटलावर गुन्हा दाखल
गाडी पकडल्याने घातला ट्रॅफिक पोलिसाशी वाद
विवेक तोटेवार, वणी: भरधाव वेगाने वाहन चालविल्यामुळे पोलिसांनी कार्यवाही केल्यामुळे पोलीस पाटलाचे पोलिसांशी हुज्जत घातली. यावरून संबंधित पोलीस पाटलावर सरकारी कामात अडथडा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी संध्याकाळची ही घटना आहे.
बुधवारी सायंकाळी 7 वाजता दरम्यान राजूरचे पोलीस पाटील सरोज भास्कर मुन (30) राहणार राजूर कॉलरी हे टिळक चौकातून भरधाव वेगाने वाहन चालवीत असताना वाहतूक पोलीस निलेश कुंभेकर यांनी त्यांचे वाहन पकडले. त्यावेळी निलेश सोबत चालन देण्यावरून वाद घातला. निलेश यांनी सदर वाहन वाहतूक सहाय्यक निरीक्षक संग्राम ताटे यांच्या आज्ञेने वाहतूक शाखेत जमा केले.
त्या ठिकाणी वाहन आणल्यानंतर सरोज याने वाहतूक पोलीस मनोहर कुमरे यांना शिवीगाळ केली व त्यांच्या हातून चालन बुक हिसकावून घेतले. व हुज्जत घालण्यास सुरवात केली. या कारणावरून कुमरे यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात सरोज मुन यांच्यावर कलम 353, 279 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.