चोरट्याने मारला डिजिटल शाळेतील टीव्हीवर डल्ला

0

सुशील ओझा, झरी: मांडवी या गावातील जिल्हा परिषद शाळेतून एलसीडी टीव्ही चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. सोमवारी शाळा उघडल्यानंतर ही घटना शिक्षकांच्या निदर्शनास आली.

८ सप्टेंबर शनिवारला सकाळच्या सत्रातील शाळा आटोपल्यानंतर शिक्षक, कर्मचारी घरी निघून गेले. रविवार शाळा बंद असल्याने १० सप्टेंबर सोमवारला सकाळी ९ वाजता शिक्षक श्याम पोमसे शाळेत गेले होते. त्यावेळी त्यांना वर्ग ६ ची खोली उघडी असल्याचे दिसले. त्यांनी वर्गखोलीत जाऊन बघितले असता, ३२ इंचचा एल सीडीटीव्ही अंदाजे किंमत २८ हजार ६०० रुपये चोरून नेल्याचे आढळले.

टीव्ही चा शोध घेतला असता आढळून न आल्याने श्याम पोमसे यांनी पाटण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.