ज्योतिबा पोटे, मारेगाव: वणी वरून यवतमाळ कडे प्रवासी घेऊन जात असताना दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रॅव्हल्सला अपघात झाला. सोमवारी दुपारी ही घटना घडली. यात सुदैवाने जीवितहाणी झाली नाही. पण काही प्रवाशी किरकोर जखमी झाले.
वणी वरून दुपारी एक खासगी ट्रॅव्हल्स (एम एच 29,एम 8330) प्रवासी घेऊन यवतमाळ कडे भरधाव वेगाने जात असताना मारेगाव पासून दोन किमी अंतरावर असलेल्या इस्सार पेट्रोल पंप जवळ मध्ये रस्त्याच्या मध्ये दुचाकी (एम.एच२९,ए.बी.५८७५) आली. यात दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने ट्रॅव्हल्स थेट शेतात घुसवली.
शेतात ट्रॅव्हल्स शिरताना चालकाचे ट्रॅव्हल्सवरचे नियंत्रण सुटले नसल्याने मोठी हाणी टळली. यात सात प्रवासी जखमी झाले असुन ट्रॅव्हल चालक दिनेश खंडारे, वय ३५, प्रवासी ललिता विठ्ठल मडावी, वय ३५, लक्ष्मी गणेश अंबादेवे वय ५०, रूपाली सतीष उईके, वय ४०, श्रीकांत विजय गावंडे, वय ३०, मुर्लीधर लखमापुरे, वय ५८, गिता मुर्लीधर लखमापुरे, वय ५२ यांना किरकोळ इजा झाली. त्यांच्यावर उपचार करून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.