स्वरधारा ग्रुप व संघर्ष संस्थेने घेतली 100 झाडांच्या मेन्टनन्सची जबाबदारी
मारेगावातील महादेव मंदिर परिसरात केले वृक्षारोपण
बहुगुणी डेस्क, मारेगाव: येथील स्वरधारा ग्रुप व संघर्ष बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मारेगाव येथील महादेव मंदिर परिसरात वृक्षारोपण करून प्रत्येक झाडांना संरक्षण देण्यात आले. यावेळी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शंभर झाडे जगवण्याचा निर्धार केला आहे. शहरातील पत्रकार व स्वरधारा गृपचे सर्वेसर्वा नागेश रायपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला होता. यावेळी स्थानिक पत्रकार व पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.
शहरात सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रमात नेहमी अग्रेसर असलेले स्वरधारा ग्रुप व संघर्ष संस्थेच्या वतीने दरवर्षी सार्वजनिक स्थळी वृक्षारोपण करण्यात येते. वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रांत खाडे यांच्या मार्गदर्शनात यावर्षी सुध्दा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावर्षी महादेव मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. येत्या महिनाभरात शहरातील सार्वजनिक स्थळी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. वृक्षारोपण केलेले अनेक झाडे दगावतात. त्यामुळे खबरदारी म्हणून झाडे जगण्यासाठी प्रत्येक झाडाला संरक्षण देऊन शंभर झाडे जगवण्याचा निर्धार स्वरधारा ग्रुप व संघर्ष संस्थेतर्फे यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक कोरडे, नागेश रायपुरे, विवेक बोबडे, श्रीकांत सांबजवार, आकाश येरमें, हरिष नेहारे, संदीप नागोसे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्योतीबा पोटे, तालुका अध्यक्ष माणिकराव कांबळे, श्रीधर सिडाम यांची प्रमुख उपस्थिती होती.
हे देखील वाचा: