जब्बार चीनी, वणी: वणीत भारत-चीन सीमेवरील गलवान घाटीमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यासोबतच चिनी सैनिकांच्या भ्याड कृत्याचा निषेध देखील करण्यात आला. राष्ट्रसंवर्धन समिती तर्फे वणीतील शिवतीर्थावर हा कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता.
गलवान घाटीमध्ये चिनी सैनिकांनी दि. 15 जूनला पूर्वतयारी करून भारतीय जवानांवर एक प्रकारे हल्ला केला. या विश्वासघातकी हल्ल्याचा भारतीय शूरविरांनी सडेतोड मुकाबला करून आपल्यापेक्षा दुप्पट चिनी सैनिकांना यमसदनी पाठवून साम्राज्यवादी व विस्तारवादी भूमिका असणाऱ्या चीनला सक्त संदेश दिला आहे. या झटापटीत एका कर्नल सह 20 भारतीय शूरवीरांना आपले प्राण गमवावे लागले.
या शूरवीरांना वणीकरांनी श्रद्धांजली अर्पण करून विश्वासघातकी देशाचे राष्ट्रपती शी जिनपिंग यानाच्या पुतळ्याला चपला, जोडे व लाता मारून चीनचा राष्ट्रध्वज सुद्धा फाडून आपला प्रचंड रोष प्रकट केला. या प्रसंगी वणीकरमध्ये चीनच्या विरोधात संतापाची लाट उसळल्याची जाणीव होत होती. या तीव्र प्रदर्शनानंतर राष्ट्रसंवर्धन समिती तर्फे चीनच्या विरोधात कडक कार्यवाही करून धडा शिकविण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्या मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी प्रा. राजेश झिलपिलवार, राजेश पांमपट्टीवार, प्रशांत भालेराव, अनुराग काठेड, धवल पटेल, उदय जोबनपुत्रा, ऍड. प्रवीण पाठक, संदीप मदान, कृष्णा पुरवार, कुमार पानेरी, लक्ष्मण उरकुडे, विवेक पांडे, आशिष सिसोदिया, परितोष पानट, सचिन पांडे, नथ्थू डुकरे, विवेक देशपांडे सह मोठ्या संख्येने वणीकर नागरिक उपस्थित होते.