ब्रेकरवर आदळून टाटा एस वाहनावर पलटी झाला भरधाव ट्रक

राज्यमार्गावरील गतीअवरोधक ठरताहेत जीवघेणे

जितेंद्र कोठारी, वणी : राज्यमार्गावर ठिकठिकाणी उभारण्यात आलेले गतीअवरोधक (ब्रेकर) वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरत आहे. शनिवार 3 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान वणीच्या दिशेने जात असलेला भरधाव ट्रक राज्यमार्ग क्रमांक 319 वर उमरी गावाजवळ असलेल्या ब्रेकरवर उसळला आणि रस्त्याच्या बाजूला प्रवासी निवाऱ्या समोर उभ्या असलेल्या टाटा एस (छोटा हत्ती) वाहनावर जाऊन पलटी झाला. यात टाटा एस वाहनाचा चेंदामेंदा झाला. सुदैवाने वाहनात चालक व इतर कोणीही व्यक्ती नसल्याने मोठी घटना टळली.

Podar School 2025

मिळालेल्या माहितीनुसार चुरी घेऊन वणीकडे येणारा ट्रक क्रमांक (MH40CD9341) हा उमरी फाट्यावर गतीअवरोधकावर आदळला. यात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्याच्या बाजूला उभे असलेले टाटा एस मालवाहू वाहनाला धडक देऊन पलटी झाला. टाटा एस वाहनाचा चालक पाणी पिण्यासाठी हॉटेलमध्ये गेला होता. त्यामुळे त्याचा जीव वाचला. तर गंभीर जखमी ट्रक चालकाला वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रकमधील चुरी रस्त्यावर पसरल्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

देशातील संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गावरील गतीअवरोधक (ब्रेकर) हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. मात्र वणी तालुक्यातील अनेक मार्गावर गावातील नागरिक व काही गाव पुढाऱ्यांनी कंत्राटदाराना गावात व फाट्यावर गतीअवरोधक तयार करण्यास भाग पाडले. अपघात रोखण्यासाठी अवैधरित्या उभारण्यात आलेले गतीअवरोधकच अपघाताला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे राज्यमार्गावरील सर्व गतीअवरोधक काढण्याची मागणी होत आहे.

Comments are closed.