ट्रकच्या चाकात येऊन चालकाचा मृत्यू

उकणी चेकपोस्ट जवळील घटना

0

विवेक तोटेवार, वणी: ट्रकच्या मागच्या चाकात आल्याने ट्रकचालकाचा मृत्यू झाला. ही घटना दि. 2 बुधवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास उकणी चेकपोस्ट जवळ घडली. मारोती दत्तू वरवाडे (वय 23) रा. शिरपूर असे मृतकाचे नाव आहे. 

वणी तालुक्यातील उकणी खुल्या खाणीत कोळसा भरण्यासाठी ट्रक क्रमांक (एम.एच. 34 बीजी – 4565 ) चेकपोस्ट वरून आत येत होता. यावेळी वाहनचालक असलेला मारोती वरवडे चेकपोस्टवरून पावती घेऊन आपल्या ट्रककडे निघाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मात्र अनवधानाने तो दुसऱ्या ट्रकच्या मागच्या चाकात आला. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी अज्ञात आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उत्तरीय तपासणीनंतर शिरपूर येथे मृतकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतकाच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.  

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.