मार्डीजवळ कोळशाने भरलेला भरधाव ट्रक पलटला

अपघात होताच चालक ट्रक सोडून पसार

भास्कर राऊत, मारेगाव: खैरी वरून मार्डी मार्गे वणीकडे कोळसा घेऊन जाणारा ट्रक मार्डीजवळ पलटला. आज दि. 2 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजताच्या दरम्यान ही घडली. मात्र ट्रक पलटूनही सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या मार्गावर असेलल्या धोकादायक वळणावरचा हा पाचवा अपघात आहे. सातत्याने होणा-या अपघातामुळे प्रशासनाने यावर योग्य ती उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  

एकोना कोळसा खाणीतील कोळसा हा खैरी-मार्डी मार्गे वणी जवळील पुनवट येथील कोल वॉशरीवर नेला जातो. आज दि. 2 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजताच्या दरम्यान एक ट्रक (MH40 BG1722) भरधाव वेगाने मार्डीकडे येत होता. अशातच मार्डीजवळील खैरी रोडला असलेल्या जिनिंगजवळील वळणावर हा ट्रक पलटला. ट्रकमध्ये असलेला कोळसा हा नालीमध्ये गेला. परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ट्रक पलटी होताच चालक ट्रक सोडून पसार झाला. दुपारी ट्रकमधील कोळसा काढणे आणि ट्रक उभा करण्याचे प्रयत्न सुरु होते. या रस्त्याने याच वळणावर हा पाचवा अपघात आहे. त्यामुळे हे वळण भविष्यात अपघात प्रवण स्थळ ठरू शकतात.

अपघात थांबविण्यासाठी उपाययोजना गरजेच्या
मार्डी हे व्यापारीकदृष्ट्या परिसरात महत्वाचे गाव आहे. येथे जिनींग, बाजार समिती, बँका, कॉलेज, खरेदी – विक्री, सहकारी संस्था, आरोग्य केंद्र, असे अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालये आहे. त्यामुळे येथे परिसरातील नागरिकांची नेहमीच रेलचेल असते. मार्डी येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. बुधवारी तर मार्डी येथे बाजारानिमित्ताने मोठी गर्दी असते. येथील काही बाजार हा वणी-वडकी रस्त्यावरही भरतो. या रस्त्याने जाणारी वाहने ही भरधाव वेगाने जातात. नांदेपेरा ते खैरी दरम्यान साबांविभागाने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे.

हे देखील वाचा: 

चला.. या दिवाळीला आपल्या घराला देऊ एशियन पेंटसची शाईन

निधन वार्ता: पांडुरंग प्रेमलवार यांचे निधन

 

Comments are closed.