वर्धा नदीच्या पुलावरुन ट्रक कोसळला

वेकोलि प्रशासन आता तरी लक्ष देणार का?

0

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील मुंगोलीजवळ वर्धा नदीवर असलेल्या पुलावरून ट्रक कोसळला. आज शुक्रवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली. मात्र यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सकाळच्या सुमारास एमटीसी कंपनीचा ट्रक (MH34- AB 2448) घुग्गुस सायडिंगवर कोळसा खाली करून पंनगंगा (विरूर) येथे परतत होता. मंगोलीजवळील वर्धा नदीच्या पुलावर चालक फारुख शेख (35) यांचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट पुलावरून खाली कोसळला. यात चालकाच्या हाताला दुखापत झाली आहे.

साखरा ते मुंगोली रस्ता व वर्धा नदीवरील मुंगोली-नकोडा येथील पूल व रस्ता कोळसा वाहतुकीचा उद्देश समोर ठेऊन बनविण्यात आला. त्या वेळी फक्त मुंगोली खुली खदान सुरू होती. मात्र आता मुंगोली, कोलगाव व पैनगंगा (विरुर) या तीन खदाणीतून कोळसा वाहतूक सुरू आहे. मात्र या रस्त्यात कोणताही बदल करण्यात आला नाही.

आधीच साखरा ते मुगोली रस्त्याची अवस्था भयावह आहे. त्यातल्या त्यात वेकोली कडून ओव्हरलोअड वाहतूक, विनापरवाना चालकांद्वारे वाहतूक वाहतून, मद्यप्राशन करून वाहतूक असे प्रकार नेहमी घडतात. दोन दिवसांपूर्वीच पेटत्या कोळशाची वाहतूक केल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त आहेत.

या संदर्भात या परिसरातील सरपंचानी जिल्ह्याधिकारी यांच्यापर्यंत तक्रारी केल्या. उपविभागीय अधिकारी यांच्यासोबत बैठक ही घेतली. यात वेकोली प्रशासन व वाहतूक उपविभाग वणी यांना सूचना देण्यात आल्या. मात्र त्यावर कुठलीच योग्य ती कार्यवाही करण्यात आली नाही.

( हे पण वाचा: मुंगोली रोडवरून जळत्या कोळशाची वाहतूक)

या गंभीर प्रकाराकडे आतातरी प्रशासनाने लक्ष घालावे आणि योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी कोळसा खाण प्रकल्पग्रस्त संगर्षं समिती वणीचे मुख्य संयोजक अनिल तेलंग यांच्यासह संयोजक मुंगोलीचे सरपंच रुपेश ठाकरे, संयोजक शिवणीचे सरपंच प्रकाश बलकी आणि गावक-यांनी केली आहे.

लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.