महिलेला पाठवला I Love You मॅसेज, रंगेल जोडगोळी अटकेत

माजी सरपंचाची ग्रा. पं. कर्मचा-यासह महिलेशी भर रस्त्यात लगट

0

नागेश रायपुरे, मारेगाव: एक महिला कर्मचारी कार्यालयाच्या बाजूलाच नोकरी करायची. तिला बघून माजी सरपंचाच्या मनात लड्डू फुटला. त्यातच भर पडली ग्रामपंचायतच्या एका कर्मचा-याची. मनात दोन दोन लड्डू फुटले असतानाच त्यातील एकाने चक्क महिलेला आयलव्हयूचा मॅसेज पाठवला तर दुस-याने भर रस्त्यात जवळ ओढून लगट करण्याचा प्रयत्न केला. सध्या या रंगेल जोडगोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहे. मात्र लोकप्रतिनिधी अशा कृत्यात आढळून आल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.

तालुक्यातील मार्डी पासून नजीक असलेल्या केगाव (बोदाड) हे गाव आहे. या गावात गजानन आत्राम (50) हा सरपंच होता.  मात्र नुकताच कार्यकाळ संपल्याने या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. ग्रामपंचायतच्या बाजुलाच एका ठिकाणी एक महिला नोकरी करते.

तर ग्रामपंचायतीत महादेव जोगी (35) कर्मचारी म्हणून काम करतो. गजानन आत्राम आणि महादेव या दोघांचीही पीडित महिलेवर नजर होती. शुक्रवारी सध्याकाळच्या सुमारास पीडित महिला ही तिच्या मुलीसह कार्यालयीन कामासाठी नोकरीच्या ठिकाणी गेली. रस्त्यातच गजानन व महादेव हे दोघे उभे होते. पीडित महिला तिथे पोहोचली असता महादेवने तिचा हात पकडून तिला जवळ ओढत लगट करण्याचा प्रयत्न केला.

सदर प्रकारामुळे पीडितेने आरडाओरड सुरू केली असता दोघेही घाबरून पळून गेले. सदर महिलेने घरी जाऊन आपल्या पतिला ही संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर त्या महिलेने पतीसह मारेगाव पोलीस स्टेशन गाठले.

कर्मचारी पाठवायचा I Love You चा मॅसेज
ग्रामपंचायत कार्यालयात काम करत असलेला कर्मचारी महादेव याने पीडित महिलेला आयलव्हयू असा मॅसेज केला होता. या पूर्वीही त्याने महिलेला हा मॅसेज पाठवून त्रास दिला होता. घटनेच्या दिवशी दोघेही सोबत होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार जगदीश मंडलवार यांनी तात्काळ दखल घेत त्या दोघांनाही अटक केली.

ग्रामपंचायतीला लावला डाग…
दोन आरोपी पैकी एक आरोपी हा ग्रामपंचायतचा माजी सरपंच आहे. तर दुसरा ग्रामपंचायतचा कर्मचारी आहे. गावात शांतता अबाधित ठेवण्याची जबाबदारी असणा-या लोकप्रतिनिधींकडूनच असे कृत्य घडल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी दोघांवरही भादंवि कलम 354, 354 (अ), 507, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मारेगावचे ठाणेदार जगदीश मंडलवार यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.