अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांना अटक

स्थनिक गुन्हे शाखेची कारवाई

0

जितेंद्र कोठारी, वणी: वणी ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या परवानाधारक देशी दारु दुकानातून अवैध विक्री करीता दारु नेत असतांना दोघांना स्था. गुन्हा शाखा पथकाने अटक करून त्यांच्या जवळून देशी दारुच्या बाटल्यासह 1 लाख 34 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

स्थानिक गुन्हे शाखा पो.उप निरीक्षक श्रीकांत जिंदमवार पथकासह! गुरुवारी वणी परिसरात पेट्रोलिंग करीत होते.  त्यांना मिळालेल्या गोपनीय सूचनेवरून पथकाने ग्रामीण रुग्णालय परिसरात सापळा रचुन रुग्णालयाच्या बाजूने असलेल्या दानवे यांच्या देशी दारु दुकानातून मोटारसायकलवर अवैध विक्री करीता संत्रा ब्रँड देशी दारूच्या 200 बॉटल वाहतूक करताना दोन इसमाना अटक केली.

अटक झालेल्या आरोपी विशाल विनोद लोणारे वय (33), व मुकेश सुभाष लोहकरे वय (28) दोघ रा. अशोक सम्राट नगर, वणी व पंचासमक्ष देशी दारु नग 200 बॉटल किंमत 5000, रोख 13 हजार , बजाज पल्सर मोटारसायकल व मोबाईल जप्त करण्यात आले. अधिकची माहिती घेतली असता आरोपी विशाल लोणारे यांच्या घरातील बाथरूम मधून देशी दारूच्या 90 एम.एल. च्या 1000 बॉटल्या किंमत 26000 रुपये असे एकूण 1 लाख 34 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल स्था.गु.शाखा पथकाने आरोपीकडून जप्त केले.

अवैध दारु वाहतूक व बाळगणारे आरोपी तसेचआरोपीना माल पुरविणारे परवानाधारक वणी येथील एस. दिवान, ला.क्र.-सीएल-3, अनुज्ञप्ती न.107/ 201 चे मालक यांच्या विरुद्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार पो.स्टे. वणी येथे कार्यवाही नोंद केली आहे.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हा शाखा यवतमाळचे पो.उ.नि. श्रीकांत जिंदमवार, पो.हवा. गजानन डोंगरे, पो.ना. उल्हास कुरकुटे, पो.कॉ. किशोर झेंडेकर, पो.कॉ. निखिल मडसे व वणी पो. स्टे.चे सहा.फौजदार जगदीश बोरनारे यांनी पार पाडली.

Leave A Reply

Your email address will not be published.