दोन दिवसानंतरही पळसोनी येथील ‘क्रिष्णा’ बेपत्ताच

मंगळवारी शाळेसाठी निघालेला क्रिष्णा साई मंदिरजवळून बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: शाळेत जातो म्हणून घरुन निघालेला पळसोनी येथील 16 वर्षीय क्रिष्णा काकडे हा विद्यार्थी मंगळवार 23 नोव्हे. रोजी साई मंदिर परिसरातून बेपत्ता झाला होता. सगळीकडे शोध घेऊन अद्यापही क्रिष्णाचा काही सुगावा लागलेला नाही. याबाबत क्रिष्णाचे काका नितीन काकडे रा. पळसोनी यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये पुतण्या हरवल्याची तक्रार दाखल केली आहे.

प्राप्त माहितीनुसार क्रिष्णा प्रवीण काकडे (16) रा. पळसोनी हा विद्यार्थी वणीतील लॉयन्स इंग्लिश मिडीयम शाळेत इयत्ता 10 व्या वर्गात शिक्षण घेत आहे. पळसोनी येथून दररोज ऑटोने तो शाळेत येतो. नेहमीप्रमाणे मंगळवारी 23 नोव्हे. रोजी सकाळी 10 वाजता क्रिष्णा हा गावातील उमेश खैरे यांच्या ऑटोमध्ये बसून वणी येथे आला व साई मंदिर चौकात तो ऑटोमधून उतरला.

मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही. शाळा सुटल्यानंतर आधार कार्ड अपडेट करायचं आहे असे क्रिष्णाने त्याच्या आईला सांगितले होते. त्यामुळे क्रिष्णाला घरी यायला उशीर झाला असेल. असे क्रिष्णाच्या आईला वाटले. मात्र तो संध्याकाळ झाली तरी घरी न परतल्याने सं. 6.30 वाजता क्रिष्णाच्या आईने ही बाब त्याचे काका नितीन काकडे यांना सांगितली.

नितीन यांनी ऑटोचालक उमेश खैरे याना विचारणा केली असता त्यांनी साई मंदिर चौकात सोडल्याचे सांगितले. नितीन यांनी लॉयन्स शाळेच्या शिक्षकांना विचारणा केली असता क्रिष्णा मंगळवारी शाळेत आलाच नाही असे याच्या वर्गशिक्षकांनी माहिती दिली. कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे शोध घेऊन ही क्रिष्णा मिळून आला नाही.

अखेर क्रिष्णाचे काका नितीन मधुकर काकडे यांनी रात्री 11 वाजता वणी पो.स्टे.ला त्याचा पुतण्या नाव क्रिष्णा प्रवीण काकडे (16) रा. पलसोनी याला कुणीतरी अज्ञात माणसाने पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम 363 अनव्ये गुन्हा दाखल करून शोध घेणे सुरु केले आहे.

क्रिष्णाची माहिती मिळाल्यास संपर्क साधा
क्रिष्णा काकडे याचे वय 16 वर्ष असून त्याचा रंग गोरा व केस काळे आहे. उंची 5 फूट 8 इंच, गोल बांधा, बांधा मध्यम आहे. क्रिष्णा घरुन निघाला तेव्हा अंगावर लाल रंगाचा टीशर्ट, हिरवा रंगाचा पँट व पायात स्लीपर चप्पल घालून होता. असे वर्णन असलेला मुलगा कोणाला दिसल्यास किंवा माहिती असल्यास वणी पोलीस स्टेशनच्या 07239225078 या क्रमांकावर सूचना द्यावी. किंवा त्याच्या कुटुंबीयांना 8668228166 या क्रमांकावर संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले आहे.

हे देखील वाचा:

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे वारंवार शोषण

ट्रॅक्टरखाली दबून मजूराचा मृत्यू तर चालक जखमी

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.