दोन अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जितेंद्र कोठारी, वणी : वेगवेगळ्या गावातील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची दोन घटना तालुक्यात घडल्या. एकाच दिवशी वणी व शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

पहिल्या घटनेत वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत तालुक्यातील एका गावातील रहिवासी मुली वणी येथे भाड्याची खोलीत करून राहायची. ती एका महाविद्यालयात 11 वी मध्ये शिक्षण घेत होती. ही अल्पवयीन विद्यार्थिनी 13 मार्च पासून बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या आईने 14 मार्च रोजी सायंकाळी वणी पोलीस ठाण्यात दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी वेगाने तपासचक्र फिरवून अवघ्या काही तासातच मुलीचा शोध लावून पोलीस स्टेशनमध्ये आणले.

मुलीला तिच्या आईच्या ताब्यात देऊन पोलिसांनी आईकडून ताबापत्र लिहून घेतला. ताब्यातील मुलीला घेऊन घरी जात असताना रात्री 8 वाजता दरम्यान तहसील कार्यालय समोर आईची नजर चुकवून अल्पवयीन विद्यार्थिनी परत बेपत्ता झाली. सर्वत्र शोध घेऊनही मुलगी मिळून आली नाही. त्यामुळे बेपत्ता मुलीच्या आईने पुन्हा 28 मार्च रोजी वणी पोलीस स्टेशनमध्ये कुणीतरी अज्ञात व्यक्तीने तिच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार दाखल केली.

दुसऱ्या घटनेत शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील गावातील शेतमजुरी करणाऱ्या व्यक्तीने 28 मार्च रोजी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. कायर येथील एका महाविद्यालयात 11 वी मध्ये शिक्षण घेत असलेली त्याची अल्पवयीन मुलगी 27 मार्च रोजी घरून बेपत्ता झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. वडील, आई व भाऊ 27 मार्च रोजी एका कार्यक्रमानिमित्त वणीला गेले असता कुणीतरी अज्ञात व्यक्तीने 16 वर्षाच्या मुलीला फुस लावून घरून पळवून नेल्याची तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुध्द कलम 363 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनेत वाढ, पालकात चिंतेचे वातावरण

मागील काळात तालुक्यातून अल्पवयीन मुली कुणालाही न सांगता घरून बेपत्ता झाल्याची अनेक घटना घडल्या आहेत. ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी वास्तव्यास असलेल्या 13 ते 17 वयोगटातील मुलींना विविध प्रकारचे आमिष दाखवून प्रेम जाळ्यात ओढून तिचे शारीरिक शोषण व नंतर पळवून नेल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. शहरालगत ले आऊट व खुल्या जागा या प्रेमवीरांना भेटण्याचे ठिकाण झाले आहे. अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची घटनांमुळे पालकवर्गही चिंतेत पडले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.