नागेश रायपुरे, मारेगाव: आज पासून तालुक्यातील 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना कोविडची लस देण्यास सुरुवात झाली. ग्रामीण रुग्णालयात हे लसीकरण सुरू कऱण्यात आले आहे. 45+ व्यक्तींना लसीकरण सुरू होते. मात्र 18+ व्यक्तींना तातडीने लसीकरण सुरू करावे तसेच लसीचा तुटवडा दूर करावा यामागणीसाठी युवासेनेतर्फे युवासेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चचडा यांच्या नेतृत्वात तहसीलदार दीपक पुंडे यांना निवेदन देण्यात आले होते.
जिल्ह्यात काही तालुक्यात 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींसाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरू होती. मात्र मारेगाव तालुक्यात या वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम चालू न झाल्याने तालुक्यातील हजारो नागरिक कोरोना लसीकरण पासून वंचीत होते. तसेच तालुक्यात लसींचा तुडवडा देखील सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
18+ व्यक्तींना लसीकरण सुरू करावे व लसींचा तुटवडा दूर करावा या मागणीसाठी युवा सेनेच्या वतीने सोमवारी दिनांक 10 मे रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चचडा, तालुका प्रमुख मयुर ठाकरे, तालुका संघटक श्रीकांत सांबजवार उपस्थित होते.
लसींचा तुटवडाही दूर करावा: विक्रांत चचडा
18+ व्यक्तींचे लसीकरण सुरू करावे या मागणीसाठी आम्ही तहसिलदार यांची भेट घेतली. तससिलदार यांनी तातडीने यावर कार्यवाही करत जिल्हा प्रशासनाला मेल केला तसेच मोबाईलवरून संपर्कही साधला. या प्रकऱणी प्रशासनाने तातडीने कार्यवाही केल्याने आज पासून लसीकरणाला सुरूवात झाली आहे. त्याबद्दल आम्ही प्रशासनाचे आभार मानतो. याशिवाय लसीकरणाचा तुटवडाही दूर करावा जेणेकरून लसीकरणात खंड येणार नाही व नागरिकांना त्रासही होणार नाही.
: विक्रांत चचडा, जिल्हाध्यक्ष युवासेना
हे देखील वाचा: